तुळजापूर : पेट्रोल पंपाच्या मुख्य टाकीचे टोपन उघडून डिझेल चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चौघाविरूध्द तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास सांगवी मार्डी परिसरात घडला़याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सांगवी मार्डी शिवारात असलेल्या पेट्रोल पंपाचे मालक अजित हंगरगेकर हे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पाहणी करण्यासाठी गेले होते़ त्यावेळी तीन-चार अज्ञात इसमांनी पंपावरील डिझेलच्या मुख्य टाकीचे टोपन उघडून त्यात पाईप सोडून डिझेल चोरी सुरू केली होती़ हंगरगेकर हे येत असल्याची चाहूल लागताच चोरीसाठी वापरलेले साहित्य तेथे टाकून चोरट्यांनी पळ काढला़ याबाबत हंगरगेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमांविरूध्द तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सदरील घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत. (वार्ताहर)
सांगवी परिसरात डिझेल चोरीचा प्रयत्न
By admin | Updated: September 13, 2014 23:27 IST