शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

फर्दापूर बसस्थानकात भरधाव ट्रक घुसला; दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:46 IST

जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील फर्दापूर बसस्थानकावरील दुकानांत भरधाव ट्रक घुसल्याने दोन जण ठार, तर दोन गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात रविवारी सायंकाळी सव्वासहा वाजता घडला. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला.

फर्दापूर : जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील फर्दापूर बसस्थानकावरील दुकानांत भरधाव ट्रक घुसल्याने दोन जण ठार, तर दोन गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात रविवारी सायंकाळी सव्वासहा वाजता घडला. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला.सिल्लोडकडून जळगावकडे मळी घेऊन जाणारा ट्रक (एमएच-२८, बी-७६२५) अजिंठा घाट उतरल्यानंतर भरधाव वेगाने येऊन येथील रस्त्यालगत असलेल्या बसस्थानकावरील दुकानात घुसला. प्रथम त्याने प्रेमचंद कोटिये यांच्या पादत्राणे दुकानाला धडक दिली. नंतर बाजूलाच असलेल्या बंद पोलीस चौकीचा चुराडा करून पोलीस चौकीशेजारील बंद असलेल्या महावीर बुक स्टॉलला धडक दिली. यात पोलीस चौकी व या दोन दुकानांचे मोठे नुकसान झाले.बसस्थानकावर गर्दी असल्याने या ट्रकखाली चिरडून युसूफ रशीद यादगारवाले (६५, रा. फर्दापूर/अजिंठा) हे जागीच ठार झाले, तर अजिंठा लेणीतील भारतीय पुरातत्व विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी रामचंद्र मन्नू मंगरुळे (७९, रा. फर्दापूर) व प्रेमचंद भागचंद कोटिये (रा. फर्दापूर) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जळगाव येथे उपचारासाठी हलविण्यात आले. यातील रामचंद्र मंगरुळे यांचा रात्री उपचार सुरू असताना मृत्यू झाला.फर्दापूर पोलीस ठाण्याचे पो.नि. शरद जºहाड, सपोनि. नीलेश घोरपडे, कर्मचारी बाजीराव धनवट, संदीप सुसर, राजू काकडे, सुनील भिवसने व ग्रामस्थांनी धाव घेऊन मदतकार्य केले. पोकलेनच्या साहाय्याने ट्रक बाहेर काढण्यात आला.गतिरोधक नसल्याने अपघात वाढलेफर्दापूर हे जळगाव-औरंगाबाद महामार्गावर असल्याने शिवाय अजिंठा लेणीमुळे येथील बसस्थानकावर बाराही महिने पर्यटकांसह प्रवाशांची मोठी गर्दी असते; परंतु बसस्थानकावर गतिरोधक नसल्याने वाहने भरधाव वेगात येतात. यापूर्वीही असे अनेक अपघात होऊन अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत, तर अनेक जण जखमी झालेले आहेत. सा.बां. विभागाकडे मागणी करूनही येथे गतिरोधक टाकले जात नाहीत. गेल्या वर्षीही या बसस्थानकावर ५ विद्यार्थी बसमध्ये बसत असताना बसला अशीच एका ट्रकने धडक दिली होती. त्यात हे विद्यार्थी जखमी झाले होते.फोटो.....भरधाव ट्रक घुसल्याने फर्दापूर बसस्थानकावरील पोलीस चौकीचे मोठे नुकसान झाले.