शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

आदिवासी विद्यार्थ्यांची दिवसभर उपासमार

By admin | Updated: September 11, 2016 01:23 IST

औरंगाबाद : अरेरावी करणाऱ्या आणि निकृष्ट जेवण देणाऱ्या मेसचालकाने दिवसभर उपाशी ठेवल्याने जटवाडा रोडवरील आदिवासी विद्यार्थ्यांच्या असंतोषाचा शनिवारी बांध फुटला.

औरंगाबाद : अरेरावी करणाऱ्या आणि निकृष्ट जेवण देणाऱ्या मेसचालकाने दिवसभर उपाशी ठेवल्याने जटवाडा रोडवरील आदिवासी विद्यार्थ्यांच्या असंतोषाचा शनिवारी बांध फुटला. रात्रीचे जेवण नाकारून शंभराहून अधिक विद्यार्थी रस्त्यावर उतरले. थाळीनाद करीत विद्यार्थी वसतिगृहातून बाहेर पडले व त्यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे कूच केले. जटवाडा रोडवर आदिवासी दोनशे विद्यार्थ्यांचे शासकीय वसतिगृह आहे. गेल्या काही दिवसांपासून वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण मिळत असल्याची तक्रार आहे. शनिवारी दुपारचे जेवण दिले नाही. त्याऐवजी सायंकाळी खिचडी आणण्यात आली. विद्यार्थ्यांनी दुपारचे जेवण का आणले नाही, याचा जाब विचारल्यानंतर मेसचालकाच्या माणसांकडून विद्यार्थ्यांना धमकावणीचा प्र्रकार झाला. सायंकाळपर्यंत अनेक विद्यार्थी वसतिगृहात आले. त्यानंतर संतप्त विद्यार्थी रात्रीचे जेवण नाकारून हातात थाळ्या घेऊन रस्त्यावर उतरले. जटवाडा रोडने ते हर्सूल जेलच्या दिशेने निघाले. थाळीनाद करीत शंभरहून अधिक विद्यार्थी थाळीनाद करीत पुढे कूच करताना दिसले. मेसचालकाला किती रक्कमवसतिगृहातील प्रत्येक विद्यार्थ्यामागे मेसचालकाला ३२८५ रुपये इतकी रक्कम देण्यात येते. यामध्ये नाष्टा आणि दोन वेळच्या जेवणाचा समावेश आहे. रविवारी आणि सणाच्या दिवशी ‘फिस्ट’ (स्वीट) दिली जावी, असे बंधन आहे. मेसचालकाला मिळणाऱ्या रकमेच्या तुलनेत जेवणाला दर्जा नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव येथील आदिम आदिवासी स्वयंरोजगार संस्था यांच्याकडे जेवणाचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र, ज्या संस्थेने मूळ कंत्राट घेतले आहे, ती संस्था मेस चालवीत नाही. मेस चालविणारे बिगर आदिवासी लोक असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. वसतिगृहात आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे अधिकारी भेट देतात. मात्र ते विद्यार्थ्यांची बाजू न घेता कंत्राटदारालाच पाठीशी घालतात. विद्यार्थ्यांच्या सुविधांकडे लक्ष दिले जात नाही. वेदांतनगर परिसरातील वसतिगृहातील विद्यार्थ्यांनीही अशीच तक्रार केली आहे. सध्या गजानन फुंडे हे अधिकारी नव्याने रुजू झाले आहेत.