औरंगाबाद : पदवीधर मतदारसंघात विजयी हॅट्ट्रिक करणारे
आमदार सतीश चव्हाण यांच्या मंगळवारी (२६ जानेवारी) साजरा होणाऱ्या वाढदिवसानिमित्त
शालेय साहित्य, गरजू वस्तूंचे वाटप व स्नेहभोजनासह शालेय पुस्तके व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकांचे
वाटप होणार आहे.
याच दिवशी आ. चव्हाण यांचा भगवान बाबा बालिकाश्रम, चाटे स्कूलजवळ, बीड बायपास येथे दुपारी १ वाजता सत्कार होणार आहे. दरवर्षी सामाजिक उपक्रम घेऊन आ. चव्हाण यांचा वाढदिवस साजरा केला जातो गेल्यावर्षी हा कार्यक्रम
मातोश्री वृद्धाश्रमात साजरा झाला होता. सत्कार सोहळ्याच्या
अध्यक्षस्थानी डॉ. अविनाश येळीकर हे राहणार असून, प्रमुख पाहुणे
म्हणून जिल्हा बँकेचे संचालक अभिजित देशमुख, डॉ. पी. वाय. कुलकर्णी, प्रा. व्ही. जी. जाधव
हे असतील तर प्रमुख उपस्थितांमध्ये प्रा. एफ. जी. माळी, डॉ. राजेश करपे,
डॉ. पी. आर. थोटे, प्रा. रजनीकांत गरुड, रोहीत देशमुख, प्रा. सुरेश लिपाने हे
आहेत. या कार्यक्माचे आयोजन डॉ. भारत खैरनार, प्रा. राहुल साठे, डॉ.
रमेश शिंदे, डॉ. फिरोज सय्यद, प्रा. भरत वहाटुळे, प्रा. संभाजी जाधव, प्रा.
महेश नरवडे, प्रा. राकेश खैरनार, प्रा. उमाकांत कोरे, प्रा. माधव जाधव, डॉ.
रविंद्र पाटील, डॉ. अनिल परदेशी, प्रा. संदीप फासाटे, प्रा. संजय भोसले,
प्रा. कुणाल चव्हाण, संतोष शेळके, प्रा. जयदीप चव्हाण प्रा. चंपालाल
कहाटे, डॉ. शैलेंद्र शुक्ला, प्रा. जितेंद्र बोडखे, प्रा. संदिप गायके, डॉ. प्रभाकर
उंद्रे, डॉ. सूरज देशमुख, प्रा. स्वप्निल डावकर, प्रा. बाळासाहेब पवळ, प्रा.
विशाल साबणे, डॉ. बाळासाहेब शिंदे, प्रा. किसन सुपेकर, सुनील निकम,
प्रा. महेश खरात, प्रा. कृष्णा लांडगे, नीलेश शेजुळ आदींनी केले आहे.