जालना : येथील जिल्हा कारागृहाचा लोकार्पण सोहळा आयोजित होणार आहे. जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. कारागृह विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. सोमवार १ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. कारागृह विभागाने अधीक्षक व इतर अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. मात्र त्यांनी मोठा निष्काळजीपणा दाखविल्याने कोणालाही कल्पना देण्यात आली नाही. एवढा मोठा कार्यक्रम अतिशय गुपचुप व सर्वच लोकप्रतिनिधींना टाळून होणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. कार्यक्रमाची पत्रिकाही छापण्यात आली नाही. शासनाच्या माहिती कार्यालयालाही या कार्यक्रमाची कल्पना देण्यात आली नाही. कारागृह अधीक्षक गीते व त्यांचे सहकारी पाटील यांनी कार्यक्रमाची गुप्तता पाळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सायंकाळपर्यंत सर्वच माहिती गुप्त ठेवण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन करण्यावरून वाद झाल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
आज जिल्हा कारागृहाचा लोकार्पण सोहळा
By admin | Updated: December 1, 2014 00:47 IST