औरंगाबाद : राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये युती, आघाडीचा फज्जा उडाला असला तरी जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी आघाडी धर्म पाळला जाईल, असे संकेत मिळत आहेत. मनसेच्या पाठिंब्यावर जिल्हा परिषदेत सत्तेत आलेली काँग्रेस आघाडी पुढील अडीच वर्षांसाठी पुन्हा सत्ताधारी होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेने एकत्र येऊन मागील अडीच वर्षांत जिल्हा परिषदेचा कारभार चालविला. पुढील अडीच वर्षांसाठी काँग्रेसचा अध्यक्षही आघाडीने एकत्रितपणे निवडला. परंतु सभापतीपदाच्या निवडणुकीपूर्वी आठ दिवस आधी राज्यातील आघाडी फुटल्याने जिल्हा परिषदेत काय होणार, याविषयी चर्चेला तोंड फुटले होते. परंतु या तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन पुढील अडीच वर्षांसाठी जिल्हा परिषदेची सत्ता चालविण्यावर विचारविमर्श करणे सुरू केले आहे. त्यामुळे उद्याची निवडणूक सुरळीत पार पडेल, अशी शक्यता आहे. यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एका विषय समितीचे सभापतीपद आणि मनसेला दोन विषय समितीचे सभापतीपदे जुन्या करारानुसार मिळणार आहेत.
सभापतीपदासाठी आज निवडणूक
By admin | Updated: October 1, 2014 00:38 IST