नांदेड: शहरातील कायदा, सुव्यवस्था व शांतता अबाधित राखण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी गुरुवारी निघणार्या मोर्चाला परवानगी नाकारली आहे.यासंदर्भात प्रभारी पोलिस अधीक्षक तानाजी चिखले यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, हिंदू धर्म सुरक्षा समितीच्या वतीने माता रेणुका देवी गाडीपुरा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार होता. त्याच्या परवानगीसाठी लेखी पत्रही मिळाले होते, परंतु शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सदर परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे कोणीही कोणत्याही नियमांचे उल्लंघन करु नये, शहरातील शांतता कायम ठेवावी असे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले आहे. दरम्यान, शहरातील जुना मोंढा भागात पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. /(प्रतिनिधी)
गुरुवारच्या मोर्चाला परवानगी नाकारली
By admin | Updated: November 19, 2014 13:09 IST