भोकरदन : शहरात बुधवारी रात्री चोरट्यांनी धुमाकुळ घालून एकाच रात्री चार ठिकाणी ऐवज लंपास केला, तर दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला. या घटनेने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.भोकरदन शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या अनिलकुमार लोहाडे यांच्या महावीर टेडर्स या दुकानाचे शेटर वाकवून चोरट्यांनी दुकानातील लोखंड कापण्याचे कटर मशीन, लाकडे कापण्याची कटर मशीन व इतर साहित्य असा एकूण ४० हजारांचा ऐवज लंपास केला. जाफराबाद रोडवरून दादाराव देशमुख यांची मोटारसायकल चोरून नेली. पोस्टआॅफीस समोरूनही एक मोटारसायकल चोरून नेली. तसेच नागेश्वर टेडर्स या दुकानाचे गोडावून फोडले.मात्र गोदामात नुसते सिमेंटच्याच बॅगा असल्याने चोरट्यांनी हाती काहीच लागले नाही. त्यानंतर चोरट्यांनी शहरातील जैन मंदिरात चोरीचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिस ठाण्यात लोहाडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मात्र रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल झालेला नव्हता. (वार्ताहर)
भोकरदनमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ
By admin | Updated: August 7, 2015 01:13 IST