चंदनझिरा : सळयांच्या खरेदीत ५० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई येथील एका कंपनीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जालना तालुक्यातील खादगाव येथील महेश प्रोटॅक्स प्रा. लि. या कंपनीकडून सिंद्रजी युनिर्व्हसल प्रा. लि. सांताक्रुझ पश्चिम मुंबई, सुरेश मोहनदास असरानी, पंकज सुराणा (कार्यकारी संचालक) या तिघांनी १ कोटी ४२ हजार १३७ रुपये किंमतीच्या सळयांची मागणी केली होती. त्यानुसार या सळया पुरविण्यात आल्या. मात्र या एकूण रक्कमेपैकी ५० लाख ५० हजार ७४४ रुपये अदा करण्यात आले. उर्वरीत रक्कम सात दिवसात देण्याचे आश्वासन आरोपींनी दिले. मात्र ही रक्कम अदा न करता टाळाटाळ करण्यात आली. याप्रकरणी मुकेश महावीरप्रसाद अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून वरील तिघांविरुद्ध चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भाले हे करीत असल्याची माहिती ठाणे अंमलदार पुष्पा सूर्यवंशी यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासकामी पथक रवाना होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. (वार्ताहर)
५० लाखांच्या फसवणूक प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल
By admin | Updated: April 7, 2015 01:20 IST