राजूर : काल झालेल्या संकष्टी चतुर्थी निमीत्त राजूरेश्वर संस्थानला गणेशभक्तांकडून ३ लाख ६६ हजार ६९८ रूपये देणगी मिळाल्याची माहिती भोकरदनचे प्रभारी तहसीलदार तथा गणपती संस्थानचे अध्यक्ष श्रीरंग डोळस यांनी दिली.प्राप्त देणगीचा सविस्तर तपशिल पुढील प्रमाणे- वाहनतळ देणगी ८ हजार ७७० रूपये, प्रवेश देणगी ५३ हजार रूपये, अभिषेक देणगी ३९० रूपये, बांधकाम देणगी ३३ हजार ४०५ रूपये, सुबक मार्बल आसन देणगी २४ हजार ४८ रूपये, गुरव दानपेटी एक लाख ५७ हजार ८१५ रूपये, बांधकाम दानपेटी ५० हजार २७० रूपये असे एकूण ३ लाख ६६ हजार ६९८ रूपये प्राप्त झाले. संकष्टी चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी आज दि.९ रोजी राजूरेश्वर मंदिरात देणगी पेटया उघडल्या असता, वरील देणगी मिळाल्याचे समजले. यावेळी सरपंच शिवाजीराव पुंगळे, मंडळ अधिकारी पी.यु.कुलकर्णी, तलाठी जी.एच.गायकवाड, पो.पा. भिकनराव पुंगळे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ थोटे, पत्रकार शाम पुंगळे, देवीदास साबळे, व्यवस्थापक गणेशराव साबळे उपस्थित होते.
राजूरेश्वराला साडे तीन लाख देणगी
By admin | Updated: April 10, 2015 00:26 IST