औरंगाबाद : काँग्रेसचे औरंगाबाद पूर्वचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांच्या पदयात्रेत युवकांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. मंगळवारी नवाबपुरा, शहाबाजार भागांत काढण्यात आलेल्या पदयात्रेत मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते सहभागी झाले होते. ‘जय हो’च्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर काँग्रेसमय झाला होता. राजेंद्र दर्डा यांच्या पदयात्रेची सुरुवात नवाबपुरा भागातील हरी मशीद येथून करण्यात आली. पदयात्रेचे आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीने युवा कार्यकर्त्यांनी राजेंद्र दर्डा यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. शेकडो कार्यकर्ते गळ्यात काँग्रेसच्या पताका, हातात तिरंगी झेंडे घेऊन पदयात्रेत सहभागी झाले होते. दरम्यान, प्रत्येक मतदाराशी संवाद साधण्यावर राजेंद्र दर्डा यांनी भर दिला. पदयात्रा पुढे गवळीपुरा, नवाबपुरामार्गे जिन्सी रोडवर पोहोचली. पदयात्रा जशी पुढे जात होती, तसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत होते. राजाबाजार रोडवर राजेंद्र दर्डा यांनी दुकानदारांच्या भेटीगाठी घेत मतदानाचे आवाहन केले. त्यानंतर मुख्य रस्त्यांसह छोट्या गल्ल्यांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधण्यास त्यांनी प्राधान्य दिले. अनेक घरांमध्ये आवर्जून जाऊन त्यांनी थोरा- मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. पदयात्रा पुढे रेंगटीपुरा, जिन्सी चौक, निजामुद्दीन दर्गामार्गे बक्कलगुडा भागात पोहोचली. यावेळी परिसरातील नागरिकांनी राजेंद्र दर्डा यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. त्यानंतर पदयात्रा शहाबाजार वॉर्डात दाखल झाली. शहाबाजार निशाण, चेलीपुरा पोलीस चौकी, काचीवाडा, अशोकनगर या भागांत चांगला प्रतिसाद मिळाला. सायंकाळी ७ वाजता चंपाचौकात पदयात्रेचा समारोप करण्यात आला. पदयात्रेतील ढोल पथकाने सर्वांचे लक्ष वेधले होते. युवा कार्यकर्त्यांसह लहान मुलांनीदेखील ढोल पथकाच्या तालावर ठेका धरला. नवाबपुरा, राजाबाजार, शहाबाजार या संपूर्ण परिसरात युवा कार्यकर्त्यांनी विविध घोषणा देऊन जल्लोषपूर्ण वातावरण निर्मिती केली. या पदयात्रेत काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते, युवक आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवनेरी कॉलनी, भारतनगरात प्रतिसाद कल्पतरू सोसायटी, शिवनेरी कॉलनी, भारतनगर या भागांत काढण्यात आलेल्या पदयात्रेची सुरुवात मंगळवारी सकाळी ९ वाजता मातोश्री चौकातून करण्यात आली. पदयात्रेला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुढे वाघमारे गल्ली, गजानननगर भागात अनेक कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले.गुरुदत्तनगर, आदर्श कॉलनी, हिंदू राष्ट्रचौक, अजिंक्यनगर भागांतील गल्ल्यांमध्ये राजेंद्र दर्डा यांच्या प्रचारानिमित्त काढण्यात आलेल्या पदयात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. या भागातील मानकनगर सोसायटी, विजय चौक, मल्हार चौक, विजयनगर, बाळकृष्णनगर गल्ल्यांमध्ये मतदारांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या. पदयात्रा शिवनेरी कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर पोहोचल्यानंतर युवा कार्यकर्ते व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी परिसरातील दुकानदारांशी संवाद साधून मतदानाचे आवाहन केले. पुढे राजेचौक, गुरुदत्तनगर, साईनगर कमान, संकेतनगर चौक ते तुळजाभवानी चौकात मतदारांशी संवाद साधण्यात आला. आनंदनगरच्या पुढे पदयात्रा निघाल्यानंतर स्वामी समर्थनगर व नवनाथनगर भागातील नागरिकांना मतदानाचे आवाहन करून सकाळी ११.३० वाजता पदयात्रेचा समारोप करण्यात आला. बारी कॉलनी, अल्तमश कॉलनीत आज पदयात्राराजेंद्र दर्डा यांची पदयात्रा आज वॉर्ड क्र. ५३ बारी कॉलनी, ४६ अल्तमश कॉलनीत काढण्यात येणार आहे. दुपारी ४.३० वाजता रोशनगेटवरील हाजी फंक्शन हॉल येथून पदयात्रेला सुरुवात होईल. पदयात्रेत कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राजेंद्र दर्डा यांच्या पदयात्रेत प्रचंड उत्साह
By admin | Updated: October 1, 2014 00:42 IST