शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लोकसंख्येत साडेतीन लाखांनी वाढ

By admin | Updated: July 11, 2014 00:59 IST

गजेंद्र देशमुख/ गंगाराम आढाव , जालना २००१ च्या जनगणनेच्या तुलनेत २०११ मध्ये एकूण ३ लाख ४५, ५०३ एवढ्या संख्येने जिल्ह्यातील लोकसंख्येत वाढ झालेली आहे.

गजेंद्र देशमुख/ गंगाराम आढाव , जालना२००१ च्या जनगणनेच्या तुलनेत २०११ मध्ये एकूण ३ लाख ४५, ५०३ एवढ्या संख्येने जिल्ह्यातील लोकसंख्येत वाढ झालेली असून, २००१ च्या जनगणनेनुसार १६ लाख १२ हजार ९८० लोकसंख्या होती. २०११ च्या जनगणनेनुसार ती १९ लाख ५८ हजार ४८३ एवढी झाली आहे.दरम्यान,२०११ च्या जनगणनेनुसार पुरुषांच १० लाख १५ हजार ११६ तर स्त्रियांचे ९ लाख४३ हजार ६७ एवढे प्रमाण आहे. हे प्रमाण कमालीचे व्यस्त आहे. या जिल्ह्यात २०११ च्या जनगणनेनुसार भोकरदन तालुक्यात ३ लाख ११ हजार ११२ एवढी लोकसंख्या त्यात १ लाख ६१ हजार ७१८ पुरुष तर १ लाख ४९ हजार ३९४ एवढे स्त्रियांचे प्रमाण आहे. जाफराबाद तालुक्यात एकूण १ लाख ६३ हजार १७४ लोकसंख्या त्यात पुरुषांचे ८४ हजार ९६६ तर स्त्रियांचे ७८ हजार २०८ एवढे प्रमाण आहे. जालना तालुक्यात एकूण ५ लाख १८ हजार ८७३ लोकसंख्या त्यात २ लाख ६९ हजार ९ पुरुष तर २ लाख ४९ हजार ८६४ स्त्रियांचे प्रमाण आहे. बदनापूर तालुक्यात एकूण १ लाख ५४ हजार २५ त्यात ८० हजार ७६ पुरुष तर ७३ हजार ९४९ स्त्रिया आहेत. अंबड तालुक्यात २ लाख५५ हजार ८०० एकूण त्यात १ लाख ३२ हजार २३८ पुरुष तर १ लाख २३ हजार ६२ स्त्रिया आहेत. घनसावंगी तालुक्यात २ लाख १० हजार ८४७ एकूण त्यात १ लाख ८ हजार ८२ पुरुष तर १ लाख २ हजार १६५ स्त्रिया. तर परतूर तालुक्यात १ लाख ७७ हजार ६३० एकूण त्यात ९१ हजार ७६४ पुरुष तर ८५ हजार ८६६ स्त्रिया आहेत. मंठा तालुक्याात १ लाख ६७ हजार २२ एकूण त्यात ८६ हजार ६६३ पुरुष तर ८० हजार ५६९ स्त्रियांचे प्रमाण आहे.जिल्ह्यातील दरवार्षिक लोकसंख्या वाढीचा दर हजारी २५० एवढा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येपैैकी सर्वसाधारण २८ टक्के जालना, १० टक्के बदनापूर,भोकरदन- १७ टक्के, जाफराबाद - १० टक्के, परतूर - १० टक्के, अंबड- १३ टक्के, घनसावंगी- १२ टक्के एवढे सरासरी तालुकानिहाय लोकसंख्येचे प्रमाण आहे. जिल्ह्यात एकूण ९७१ पैैकी ९६३ वस्ती असलेली गावे आहेत. दर गावामध्ये सरासरी लोकसंख्या १ हजार ४१० एवढी आहे. २००१ च्या जनगणनेतील लोकसंख्येचा दर लक्षा घेऊन केंद्रीय सांख्यिकी संघटनेने वर्ष२०१४ पर्यंतच्या महाराष्ट्राच्या प्रक्षेपित आकडेवारी तयार केली असून, त्यावरुन अर्थ व सांख्यिकी संचालानालय मुंबई यांनी जिल्हावार व तहसीलवार प्रक्षेपित लोकसंख्येची माहिती तयार केलेली आहे. त्याप्रमाणे २००१ मध्ये तहसीलवार प्रक्षेपित लोकसंख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे (कंसात आकडेवारी २०१४ प्रमाणे) भोकरदन- २५८, (२७९) जाफराबाद - १३८ (१५६), जालना ४३७ (५२३), बदनापूर १३२ (१४१), अंबड २०९ (२३०), घनसावंगी १७४ (१८३), परतूर १४६ (१५१) व मंठा १३१ ( १३२) महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ व लोेकसंख्येच्या तुलनेत ५.५१ टक्के एवढे आहे. व लोकसंख्या १. ७० एवढी आहे. २०११ च्या जनगणनेनुसार दर चौरस किलोमीटरमागे २१० एवढी आहे. ग्रामीण भागात दर चौरस किमी मागे १७२ तर नागरी भागात दर चौरस किमी मागे ३ हजार २० एवढी लोकसंख्या आहे. नागरी भागात सर्वात जास्त भोकरदन शहरात तर सर्वात कमी अंबड तालुक्यात आहे. ग्रामीण भागातही सर्वात जास्त घनता भोकरदन व सर्वात कमी परतूर तालुक्यात आहे. जिल्ह्यात १ हजार पुरुषांमागे ९२९ स्त्रियांचे प्रमाण आहे. २०११ च्या जनगणनेनुसार तर साक्षर लोकसंख्येचे प्रमाण ७१.०९ तर शहरी भागात ८४.०४ आहे. शहरी व ग्रामीण भागात ७३.६१ एवढी लोकसंख्या आहे. राज्यात साक्षरतेत जिल्ह्याचा क्रमांक ३२ वा आहे. दारिद्र्य रेषेखालील १.०५ टक्के एवढी लोकसंख्या आहे. वयोगटानुसार लोकसंख्या ० ते १४ वयोगट- ४०. ६५टक्के, १५ ते १९- ८.८१, २० ते २४- ७.८४, २५ ते २९- ७.४२ तर ३० ते ३९- १२.८१, ४० ते ४९ - ९.८२, ५० ते ५९ - ६.१३ तर साठ वर्षावरील ६.३७ टक्के आहे.८० टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात वास्तव्यास या जिल्ह्यात २००१ व २०११ च्या जनगणनेच्या तुलनेत एकूण शहरी व ग्रामीण लोकसंख्येची आकडेवारी तपासल्यास या जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्या ग्रामीण भागात असल्याची माहिती समोर आली आहे. सरासरी ८० टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात आहे. जिल्ह्यातील ८ लाख १९ हजार ९३४ पुरुषांची लोकसंख्या ग्रामीण भागात असून, शहरी भागात १ लाख ९५ हजार १८२ पुरुष वास्तव्यास आहे.