उस्मानाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भूम, पाथरूडसह, मस्सा खंडेश्वरी येथील शाखांमधील चोरी प्रकरणाचा पोलिसांना उगलडा झाला आहे़ यात एका जीपसह १ लाख १० हजार रुपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे़जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भूम व पाथरूड आणि मस्सा खंडेश्वरी येथील शाखा फोडून रक्कम लंपास केली होती. या घटनेतील मुख्य आरोपित ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगन्नाथ लोकरे (रा़शिराळा टेंभुर्णी ता़माढा) याचा शोध घेतला असता तो बीडमध्ये असल्याचे समजल्यानंतर बीड पोलिसांना याची माहिती देण्यात आली होती़ बीडच्या स्थागुशाने ज्ञानेश्वर उर्फ माऊली लोकरे याला अटक करून बँक फोडी प्रकरणाची चौकशी सुरू केली होती़ याच दरम्यान संभाजी गाढवे (रा़देऊळगाव ता़परंडा), लक्ष्मण कळके (रा़धुसळी) सचिन काळे, अविनाश काळे (दोघे रा़ चोंडी ता़जामखेड) यांनाही अटक करण्यात आली होती़ त्यानंतर भूम पोलिसांनी त्याला बीड कारागृहातून भूम व पाथरूड चोरी प्रकरणात अटक केली होती़ यावेळी भूम येथील चोरी प्रकरणात गेलेल्या ७८ हजार रूपयांपैकी ४० हजार रूपयांचा मुद्देमाल माऊली याच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे़ त्यानंतर कळंब पोलिसांनी वरील पाच जणांना ताब्यात घेतले़ त्यावेळी त्याने श्रीगोंदा येथील चोरी प्रकरणातील एक जीप व मस्सा खंडेश्वरी येथील १ लाख ८ हजार रूपयांच्या चोरी प्रकरणात २० हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
जिल्हा बँकेच्या तीन शाखांमधील चोरीचा पर्दाफाश
By admin | Updated: March 30, 2015 00:40 IST