औरंगाबाद : लोकमत युवा नेक्स्टच्या सदस्यांना मराठी चित्रपटातील कलावंतांशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी सोमवारी ११ आॅगस्ट रोजी आहे. अभिजित पानसे लिखित-दिग्दर्शित ‘रेगे’ चित्रपट असून, देवगिरी इंजिनिअरिंग कॉलेज आणि एमजीएम (जेएनईसी) येथे सदस्यांची टीम रेगेचे कलावंत दिलखुलास संवाद साधणार आहेत. अलीकडेच अख्ख्या पोलीस दलाला हादरून सोडणाऱ्या एका वादग्रस्त ‘एन्काऊंटर’ प्रकरणाचा संदर्भ असलेल्या ‘रेगे’ या चित्रपटाशी आता रवी जाधव हे आणखी एक महत्त्वाचे नाव जोडले गेले आहे. १५ आॅगस्ट रोजी ‘रेगे’ चित्रपट राज्यभर प्रदर्शित होत आहे. महेश मांजरेकर, पुष्पकर श्रोत्री, आरोह वेलणकर, संतोष जुवेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘रेगे’चे छायालेखन आघाडीचे छायाचित्रकार महेश लिमये यांनी केले असून, हिंदीतील प्रख्यात संगीतकार माँटी शर्मा (ब्लॅक सावरियां) यांचे पार्श्वसंगीत ‘रेगे’ला लाभले आहे. अभिजित पानसे याचा लेखक- दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. देवगिरी इंजिनिअरिंग महाविद्यालयात सकाळी ११ वाजता, तर जेएनईसी कॉलेज मधील विद्यार्थ्यांसाठी दुपारी १२ वाजता संवाद साधतील, असे युवा नेक्स्टच्या वतीने कळविले आहे.
‘रेगे’ चित्रपटाची टीम सोमवारी शहरात
By admin | Updated: August 10, 2014 02:05 IST