शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

शिकवण्यांचे फुटले पेव

By admin | Updated: June 30, 2014 00:36 IST

मल्हारीकांत देशमुख, परभणी एक काळ असा होता की, विद्यार्थी कच्चा असेल तर त्याला एखाद्या विषयाची शिकवणी लावली जायची. ती देखील चोरुन,शिकवणी लावणे हे हुशार मुलांचे लक्षण मानले जात नसे.

मल्हारीकांत देशमुख, परभणीएक काळ असा होता की, विद्यार्थी कच्चा असेल तर त्याला एखाद्या विषयाची शिकवणी लावली जायची. ती देखील चोरुन, लपून. शिकवणी लावणे, गाईडचा वापर करणे हे हुशार मुलांचे लक्षण मानले जात नसे. शहरात दोन-चार शिकवणी वर्ग असायचे. आता तर गल्लीबोळात शिकवण्यांची दुकाने निघालीत. शाळेत असतील नसतील तेवढे विद्यार्थी शिकवणीवर्गाला दिसून येतात. शिकवणीला प्रतिष्ठा तर आलीच परंतु ती अनिवार्यही झाली. इयत्ता पहिलीपासून बारावीपर्यंत शहरी भागातील पालक शिकवणी लावतातच. एखाद्या विद्यार्थ्यास शिकवणी नाही हे ऐकल्यावर आश्चर्य व्यक्त होते. गरीबातला गरीब विद्यार्थी देखील माध्यमिक स्तरावर शिकवणी लावतोच.मार्क्स ओरिएंटेड शिक्षणप्रणाली जास्तीत जास्त मार्क्स कसे कमावता येतील, या स्पर्धेत विद्यार्थ्यांपेक्षा त्यांच्या पालकांचाच जास्त सहभाग दिसून येतो. आपला पाल्य स्पर्धेत मागे नको या एकमेव हव्यासापोटी पहिलीपासून शिकवणी, वेगवेगळ्या कोचिंग, अ‍ॅरोबिकपासून नृत्य, नाट्य, संगीत, अक्षरसुधारपासून कुंगफू कराटेपर्यंत मुलांना गुंतविले जाते. मुलांच्या आवडीपेक्षा पालकांच्याच अपेक्षांचे ओझे मुलांच्या माथी मारले जाते. या संदर्भाने ‘लोकमत’ने शहरी भागात शिकवणी लावण्याचे प्रमाण व त्याचे कारणे शोधताना शहराच्या विविध भागातील पालकांचे मते जाणून घेतली. सर्वेक्षणानुसार ७९ टक्के पालकांनी आपली मुले खाजगी शिकवणीला जात असल्याचे सांगितले. त्याचबरोबर खाजगी शिकवणींचे समर्थनही केले.खाजगी शिकवणीमुळे आपल्या पाल्याच्या गुणवत्तेत सुधारणा कितपत झाली, या प्रश्नाचे उत्तर देताना ७० टक्के पालकांनी सकारात्मक तर १० टक्के पालकांनी गुणवत्तेबद्दल आशावाद मांडला. गुणवत्तेशिवाय शिक्षण हा केवळ टाईमपास त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवणी लावलीच पाहिजे, हा काळ स्पर्धेचा आहे, असेही काही पालकांनी ठणकावून सांगितले. शिकवणीचा वेळ किती तास असावा, या प्रश्नाचे उत्तर देताना ६५ टक्के पालकांनी शिकवणी तीन तासांपेक्षा जास्तवेळ नसावी तर २५ टक्के पालकांनी शिकवणी किमान ४ तास असावी, असे म्हटले आहे. खाजगी शाळा शिफ्टमध्ये असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाच तास रहावे लागते. शिकवणीमध्ये तीन तास जावेत, अशी पालकांची अपेक्षा आहे. याचा अर्थ आजच्या पालकांना आपली मुलं सतत एंगेज रहावित, असे वाटते.मुलांना खाजगी शिकवणी का लावली, या प्रश्नाचे उत्तर देताना तब्बल ६० टक्के पालकांनी मुलांचा घरी अभ्यास होत नसल्याचे स्पष्ट केले. तर, २५ टक्के पालकांनी शाळेत व्यवस्थित शिकवित नसल्याचे सांगितले़ मुलांचा घरी अभ्यास होत नाही, ही पालकांना मुलांच्या अभ्यासाकडे पूर्ण वेळ देता येत नाही, याचेच चिन्ह आहे. त्यामुळे दोन्हींचा विचार केल्यास एकूण तब्बल ६० टक्के पालक आपल्या मुलांच्या अभ्यासासाठी वेळ देऊ शकत नसल्याचे स्पष्ट होते.विशेष म्हणजे २५ टक्के पालकांनी शाळेत व्यवस्थित शिकवत नसल्याचेही कारण दिले आहे. बदलतोय पालकांचा कलआपला पाल्य स्पर्धेत मागे नको या एकमेव हव्यासापोटी पहिलीपासून शिकवणी, वेगवेगळ्या कोचिंग, अ‍ॅरोबिकपासून नृत्य, नाट्य, संगीत, अक्षर सुधारपासून कुंगफू कराटेपर्यंत मुलांना गुंतविले जाते.उजळणी गरजेची...इंग्रजी माध्यमाला पसंती मिळू लागली. शिक्षणाचा खर्च वाढत गेला. आईवडील दोघांनाही नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर जावे लागले. चांगल्या शाळांमध्ये मुलांना घातले असले, तरी घरी त्यांची उजळणी घेणे गरजेचे असतेच. बदलत्या परिस्थितीनुसार पालकांना मुलांच्या अभ्यासाकडे पुरेसे लक्ष देणेही शक्य होत नाही. त्यामुळे खाजगी शिकवण्याकडे पालकांचा ओढा वाढला.