आस्थापना दोन कार्यालयातील वरिष्ठ लिपिक श्रीधर तारपे यांची झोन क्रमांक ६ चे वॉर्ड अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच झोन क्रमांक ७ मधील वरिष्ठ लिपीक संजय सुरडकर यांची झोन क्रमांक १ चे वॉर्ड अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. झोन ६ च्या वॉर्ड अधिकारी मीरा चव्हाण यांनी मनपा प्रशासक यांच्याकडे विनंती केल्यामुळे त्यांच्याकडील वॉर्ड अधिकारीपदाचा पदभार काढून घेत त्यांच्याकडे महिला व बालकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त म्हणून पदभार देण्यात आला. घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्याकडे झोन क्रमांक १ च्या वॉर्ड अधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. त्यांच्याकडील हा पदभार काढून घेत, नव्याने परिवहन व्यवस्थापक आणि पर्यटन विकास अधिकारी या दोन्ही पदांचा अतिरिक्त पदभार देण्यात आला.
वॉर्ड अधिकारीपदी सुरडकर, तारपे यांनी नेमणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:04 IST