मांडवा : परळी तालुक्यातील एका तीस वर्षीय महिलेने तिच्या एक महिन्याच्या बाळासह रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सांयकाळी मरळवाडी शिवारातील गिरजाई परिसरात घडली. धोंडाबाई बदाडे (३०) असे त्या महिलेचे नाव असून ती परळी तालुक्यातील मिरवट येथील रहिवासी होती. नवऱ्यासोबत भांडण झाल्याने धोंडाबाई ही तिच्या मिरवट येथे राहत होती. तिला एक चार वर्षांचा मुलगा होता़ महिन्यापूर्वीच तिने आणखी एका बाळाला जन्म दिला होता़ पंढरपुर-निजामाबाद रेल्वे ट्रॅक खाली जाऊन धोंडाबाईने तिच्या एक महिन्याच्या बाळासह आत्महत्या केली. तिचे हात व पाय कापले गेले होते. (वार्ताहर)
महिलेची बाळासह आत्महत्या
By admin | Updated: September 5, 2014 00:58 IST