शंकरनगर : अहिल्याबाई होळकर पासधारक शालेय मुलींसाठी मोफत प्रवासासाठी मानव विकास अभियानांतर्गत सुरू केलेल्या निळ्या गाड्यांचा वापर सामान्य प्रवाशांसाठी करण्यात येत असून खरे लाभधारक विद्यार्थी-विद्यार्थिनी मात्र उभ्यानेस प्रवास करीत आहेत़सब पढे, सब आगे बढे़़़ या विचारानुसार राज्य शासनाने मुलींना शिक्षण घेण्यास अधिक प्रवृत्त करण्यासाठी सप्टेंबर २०१२ पासून मानव विकास अभियान सुरू केले आहे़ या अभियानांतर्गत विद्यार्थिनींचे शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी त्यांचे राहण्याचे गाव ते शाळेचे ठिकाण असलेले गाव या दरम्यान विशेष बसेस उपलब्ध करून दिल्या़ निळ्या रंगाच्या मानव विकास अभियानाची जाहिरात लिहिलेल्या या बसेस सर्व आगारांना पाठवून त्या बसेस केवळ शाळेच्या वेळातच चालविण्याच्या व अन्य वेळी थांबवून ठेवण्याच्या सूचना दिल्या़नवीन गाड्या आल्यापासून आगार प्रमुखांनी केवळ नावापुरत्या शाळेच्या वेळी गाड्या सोडल्या़ त्यानंतर या गाड्यांमधून सामान्य प्रवाशांची ने-आण सुरू केली़देगलूर आगाराला मानव विकास अभियानांतर्गत एम़एच़२०-८५८७, ८५८८, ८५९३, ८५९५, ८५९७ या पाच गाड्या आल्या़ या गाड्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची ने आण करण्यासाठी विशिष्ट वेळी न लावता देगलूर आगाराने एक गाडी सकाळी- शेवाळा- औराद, दुसरी - देगलूर-भोकसखेडा-नांदेड, तिसरी- देगलूर-येरगी-हणेगाव-औराद, चौथी-सकाळी सात वाजता- देगलूर-सांगवी-देगलूर-नांदेड, पाचवी- देगलूर- अंबुलगा- हणेगाव- वझर (मुक्काम)़ अशा मार्गावर मानव विकासच्या गाड्या लावल्या आहेत़ या गाड्या चालवून देगलूर बस आगार आपले उत्पन्न वाढवून घेत आहे़ तर याउलट शासनाने विद्यार्थिनींना अहिल्याबाई होळकर पासेस दिल्या आहेत़ अशा पासधारक सर्व विद्यार्थिनींना या बसमधून प्रवास मोफत आहे़ तर विद्यार्थ्यांना प्रवासी पास सवलतीप्रमाणे बसभाडे आहे़देगलूरसह जिल्ह्याच्या सर्व आगार प्रमुखांनी शालेय मुला-मुलींसाठी आलेल्या मानव विकास अभियानातील, बसेस शाळेच्या वेळेवर आणि विद्यार्थ्यांसाठीच सोडाव्यात, अशी शिक्षक, विद्यार्थी, पालक वर्गातून मागणी होत आहे़ (वार्ताहर)बसगाड्या वेळेवर सुटेनातगावातून शाळेच्या गावी जाण्यासाठी सामान्यपणे ८़४५ ते ९ वाजेच्या सुमारास बसगाडी असावी लागते़ परंतु प्रवाशांच्या लोभापायी देगलूर आगार वेळेवर या गाड्या सोडत नाही़ कधी सुटलीच तर गाडीतील सर्व सीटवर सामान्य प्रवासी बसलेले असतात़ आणि खऱ्या लाभधारक विद्यार्थी-विद्यार्थिनींना मात्र गाव ते शाळा आणि शाळा ते गाव या अंतराचा प्रवास उभे राहूनच करावा लागतो़
विद्यार्थिनींना जागा मिळेना
By admin | Updated: June 30, 2014 00:38 IST