शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

वाळू माफियांविरोधात दमदार मोहीम

By admin | Updated: May 25, 2014 01:03 IST

अंबड : महसूल विभागाच्या पथकाने वाळू माफियांविरोधात दोन दिवस मोहीम राबवून पाच ट्रक व वाळूचे साठे जप्त केले.

अंबड : महसूल विभागाच्या पथकाने वाळू माफियांविरोधात दोन दिवस मोहीम राबवून पाच ट्रक व वाळूचे साठे जप्त केले. सामान्य नागरिकांना वाळू तस्करांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याविषयीचे वृत्त लोकमतने बुधवारी प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत स्वत: उपविभागीय अधिकारी डॉ.श्रीमंत हारकर व तहसीलदार महेश सावंत यांनी शुक्रवारी दिवसभर गोदापात्रात पाहणी करुन वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्याची मोहीम राबविली. शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास उपविभागीय अधिकारी डॉ.श्रीमंत हारकर, तहसीलदार महेश सावंत, मंडळ अधिकारी के.एस.ऐडके, ए.बी.मिरासे, तलाठी पठाण यांच्या पथकाने गोदापात्राची पाहणी करण्यास सुरुवात केली. शुक्रवार व शनिवारी या पथकाने वाळकेश्वर, गोरी-गंधारी, कुरण, गोंदी भागातील गोदापात्रात मोहीम राबविली. यावेळी पथकास गोंदीजवळील भाग्यनगर येथे अवैध वाळूसाठा असल्याची माहिती मिळाली. पथकाने हा साठा जप्त केला. याविषयी गोंदी पोलीसांत तक्रार देणार असल्याचे सांगण्यात आले. ही मोहीम शनिवारीही सुरु होती. या मोहिमेत अवैध वाळू वाहतूक करणार्‍या, क्षमतेपेक्षा जास्त वाळूची वाहतूक करणार्‍या एम.एच.२०-सी. टी. ३३३, एम. एच. ३१-सी. क्यू. ७७२९, एम. एच. २०- ए. टी. १०७७, एम. एच. २०-ए. टी. ९७७७, एम. एच. ०४- एच ६५७२ असे पाच हायवा ट्रक जप्त केले. या सर्व वाहनांवर कायदेशीर कारवाई सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहतूक सुरू असल्याने रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाली आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यांवरुन वाहतूक करणे अशक्य झाले आहे. वाळू माफियांनी उच्छाद मांडला आहे. एका वाहनामध्ये केवळ २ ब्रास वाळू नेण्याची परवानगी असताना ट्रकमधून ५ ते ६ ब्रास वाळूची वाहतूक करण्यात येत आहे. (वार्ताहर)सरकारी वाहनाने पाहणी करत असल्याची बाब सर्वसामान्यांसह वाळू माफियांच्या लक्षात येईल, हे ओळखून पथकाने सरकारी वाहनाऐवजी खाजगी वाहनांचा वापर केला. खाजगी वाहन असुनही महसूल पथक गोदापात्रात उतरल्याची कुणकुण वाळू माफियांंना लागलीच. पथक गोदापात्रात आल्याचे कळताच वाळू माफियांनी आपापल्या ट्रक, ट्रॅक्टर आदी वाहनांसह दिसेल त्या दिशेने पळ काढला.