निलंगा : निलंगा तालुक्यातील अंबुलगा मोडवर रविवारी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास बस व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून, दुचाकीवरील अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. उदगीरहून निलंग्याकडे एमएच १४ बीटी १६६५ या क्रमांकाची उदगीर-निलंगा ही बस निलंग्याकडे रविवारी ६.४५ वाजण्याच्या सुमारास येत होती. अंबुलगा मोडवर एमएच २४ आर ७३३८ या क्रमांकाच्या दुचाकीची व या बसची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीवरील विशाल सावंत (३५) हे जागीच ठार झाले. तर रणजित सावंत (वय ३०) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी रणजित सावंत यांना निलंग्याच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद झाली नव्हती. (वार्ताहर)
एस.टी.-दुचाकीचा अपघात; १ ठार, १ जखमी
By admin | Updated: November 16, 2015 00:39 IST