शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

भरारी पथकाने जप्त केले

By admin | Updated: October 14, 2014 00:41 IST

औरंगाबाद : निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने सिडकोतील टाऊन सेंटर येथे राहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या पदाधिकारी वीणा खरे (वाघमारे) यांच्या घरातून १ लाख ३८ हजार रुपये जप्त केले.

औरंगाबाद : निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने सिडकोतील टाऊन सेंटर येथे राहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या पदाधिकारी वीणा खरे (वाघमारे) यांच्या घरातून १ लाख ३८ हजार रुपये जप्त केले. ही कारवाई सोमवारी दुपारी केली. निवडणूक विभागाचे फिरते भरारी पथक क्रमांक-२ हे गस्तीवर असताना टाऊन सेंटर येथील वीणा खरे यांच्या घरासमोर महिला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पथकाला दिसली. शिवाय बंगल्यात काही महिलाही उपस्थित असल्याचे दिसले. पथकप्रमुख एस.के. गाजुलवाड, ए.आर. लांडे, सहायक ए.वाय. पवार, पोलीस कर्मचारी आर.के. गायकवाड, एस.एम. चव्हाण, एन.आर. सूर्यवंशी, आर.के. गायकवाड, वाहनचालक सय्यद मजहर, व्हिडिओग्राफर के.एस. जाधव, करण बन्सवाल यांनी तेथे जाऊन खरे यांच्या घराची इन कॅमेरा झडती घेतली. त्यावेळी वरच्या मजल्यावर आढळलेल्या एका पिवळ्या रंगाच्या बॅगमध्ये १ लाख ३८ हजार रुपयांची रोख रक्कम सापडली. या रकमेविषयी त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, त्यांची लेबर सप्लायर्सची एजन्सी आहे. या एजन्सीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन आणि त्यांचा बोनस वाटप करण्यासाठी ही रक्कम आणली आहे. यातील काही रक्कम आधीच आणलेली आहे, तर ५३ हजार रुपये बँकेतून काढल्याचे त्यांनी सांगितले. बचत गटांना ३ टक्के व्याज दराने रक्कम देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी ब्रिजवाडी येथील बचत गटाच्या या महिला येथे आल्याचे त्यांनी सांगितले. पथकप्रमुखांनी यावेळी एका महिलेचा जबाबही नोंदविला. त्यानंतर वीणा खरे, तुषार वाघमारे, नितीन वाघमारे यांच्यासमोर ही रक्कम जप्त करण्यात आली.