शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

भ्रूण हत्या रोखण्यासाठी विशेष योजना

By admin | Updated: November 4, 2014 01:38 IST

बीड : शिक्षण व आरोग्य विभागात धोरणात्मक योजना राबवायच्या आहेत़ जिल्ह्यातील स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी लवकरच विशेष योजना राबविणार असून त्याचा कृती आराखडा आठ दिवसात तयार होईल,

बीड : शिक्षण व आरोग्य विभागात धोरणात्मक योजना राबवायच्या आहेत़ जिल्ह्यातील स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी लवकरच विशेष योजना राबविणार असून त्याचा कृती आराखडा आठ दिवसात तयार होईल, अशी माहिती शिक्षण व आरोग्य सभापती बजरंग सोनवणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली़यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ एच़ व्ही़ वडगावे यांची उपस्थिती होती़ सोनवणे म्हणाले, शिक्षण विभागात अनियमितता झाली आहे काय याची खातरजमा करण्यात येईल़ बिंदू नामावली अद्ययावत करण्यात आली असून आंतरजिल्हा बदलीने आलेले शिक्षक अतिरिक्त ठरणार नाहीत़ कारण आऱ टी़ ई़ नुसार शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त झाल्या आहेत़ शिक्षण विभागात अनियमिततेला थारा देणार नाही़ अधिकारी व शिक्षकांवर अंकुश ठेवण्यात येईल, असेही ते म्हणाले़ केंद्रांची पुनर्रचना करणारशाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असून राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही, असे सभापती बजरंग सोनवणे यांनी सांगितले़ सध्या केंद्रांतर्गत २० ते २५ शाळा आहेत़ त्यामुळे नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही़ त्यासाठी केंद्रांची पुनर्रचना करण्यात येणार आहे़ एका केंद्रामध्ये ८ ते १० शाळांचा समावेश करण्यात येईल़ एम़ ओ़ २४ तास उपलब्धप्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुजू होऊन उच्च शिक्षणासाठी पगारी रजेवर जाणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेत कसे आणता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सोनवणे म्हणाले़ साथरोग नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या असून सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर तालुकानिहाय जबाबदारी निश्चित केली आहे़ वैद्यकीय अधिकारी २४ तास उपलब्ध राहतील़ आरोग्य केंद्रांतील शस्त्रक्रिया विभाग, शवविच्छेदन विभाग अद्यावत करण्यात येईल, रुग्णांना अडचण आल्यास माझ्या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन सोनवणे यांनी केले़ (प्रतिनिधी)जि़ प़ उपाध्यक्षा आशा दौंड यांनी विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतली़४पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या दुरूस्तीसाठी आलेले १ कोटी १७ लाख रूपये जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अडकलेले आहेत़ ते मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उपाध्यक्षा दौंड म्हणाल्या़४कृषी व पशुसंवर्धन हा महत्वाचा विभाग आहे़ मात्र केवळ ७ लाख रूपये निधीची तरतूद केली आहे़ अहमदनगर जि़ प़ च्या धर्तीवर निधी १ कोटी रूपयांपर्यंत वाढवून घेण्यात येईल़४शासनाच्या योजना सामान्यांपर्यंत पोहचविण्यात येतील, असे त्या म्हणाल्या़