शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

सोयाबीनवर चक्री भुंग्याचे ‘दुष्टचक्र’..!

By admin | Updated: September 4, 2014 01:25 IST

एस़ आऱ मुळे , शिरूर अनंतपाळ तालुक्यात गेली आठ-दहा दिवसांपासून पाऊस कमी आणि ढगाळ वातावरण अधिक, असा प्रकार सुरू असल्याने सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव तर वाढला आहेच,

एस़ आऱ मुळे , शिरूर अनंतपाळ तालुक्यात गेली आठ-दहा दिवसांपासून पाऊस कमी आणि ढगाळ वातावरण अधिक, असा प्रकार सुरू असल्याने सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव तर वाढला आहेच, त्याचबरोबर चक्री भुंग्याचे ‘दुष्टचक्र’ सुरू झाल्याने सोयाबीनची उभी पिके कोलमडून पडत असल्याने फवारणीचा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक ताण वाढला असून, कर्ज काढून फवारणी करण्याची वेळ आली आहे. शिरूर अनंतपाळ तालुका सोयाबीन उत्पादनात मराठवाड्यात अव्वल आल्यापासून तालुक्यात सोयाबीनची पेरणी सर्वाधिक होत असून, चालू खरीप हंगामात २८ हजार ५०० हेक्टर्स लागवडी क्षेत्रापैकी १७ हजार ६५६ हेक्टर्सवर सोयाबीनची लागवड झाली आहे. पेरणीनंतर दोन महिने पावसाने मोठा ताण दिला. त्यामुळे सोयाबीनचे उभे पीक करपले. परंतु, आॅगस्ट अखेरीस पावसाला सुरुवात झाली तरी शिरूर अनंतपाळ तालुक्यात पाऊस कमी आणि ढगाळ वातावरणच अधिक असा प्रकार गेली आठ-दहा दिवसांपासून सुरू असल्याने अगोदरच करपलेल्या सोयाबीनचे निम्मे उत्पादन घटले असून, थोडीफार फळधारणा झाली असली, तरी त्यावर पाने गुंडाळणाऱ्या अळीसह चक्रीभुंग्याच्या दुष्टचक्राची लागण झाली आहे. त्यामुळे सोयाबीनचे सशक्त पीक तात्काळ अशक्त होत आहे. परिणामी थोडेफार तरी उत्पादन पदरी पडेल, अशी अपेक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अपेक्षाभंग झाल्या आहेत. रोगाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने आणि पावसाची रिमझिम सुरू असल्याने किटकनाशक सेव्हर आणि घटकद्रव्य अशी तिहेरी फवारणी करावी लागत असल्यामुळे खर्च वाढला असून, कर्ज काढण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक ताण वाढला आहे. ४चक्री भुंग्याच्या दुष्टचक्राबाबत तालुका कृषी अधिकारी बी.बी. सुतार, अनंत गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ट्रायजोफास किंवा प्रोफोनोफॉस याची फवारणी करण्याचा उपाय असल्याचेही त्यांनी सांगितले. एकंदर, शेतकऱ्यांच्या मागे दुष्टचक्र लागले असल्याचे दिसून येत आहे.