शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
2
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
3
'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती
4
पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
5
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
6
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
7
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 
8
पत्नीला १७ वर्षांच्या मुलासोबत त्या अवस्थेत पाहिलं, पतीचं डोकं भडकलं, सिलेंडर उचलला आणि....
9
जगात भारी... Mumbai Indiansच्या जसप्रीत बुमराहने IPL मध्ये केला सर्वात 'जम्बो' विक्रम, 'हा' पराक्रम करणारा ठरला पहिलाच क्रिकेटर
10
चाललंय तरी काय? रोहित- विराटनंतर आणखी एका स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
11
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
12
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
13
Astrology: जून देणार 'या' पाच राशींच्या नशिबाला गती, येणार अच्छे दिन, बदलणार स्थिती!
14
IPL 2025 Final वरून मोठा राडा ! BCCI च्या निर्णयावर बंगाल सरकारचा घणाघाती आरोप
15
‘७५ वर्षं जगला, खूप झालं, आता पाकिस्तानचे फार दिवस उरलेले नाहीत’, योगी आदित्यनाथ यांचा इशारा 
16
IPL 2025: शुभमन गिल- ऋषभ पंतमध्ये वाद सुरू? मैदानातील व्हिडीओ समोर आल्यानंतर चर्चांना उधाण
17
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
18
Shani Dosha: शनि महादशेचा त्रास तान्ह्या बाळांनाही होतो का? काय आहे त्यावर उपाय? जाणून घ्या!
19
राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; महावितरणकडून ‘हाय अलर्ट’ जारी
20
रोहित- विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? गंभीरनं एका वाक्यात दिलं उत्तर!

‘सिंघम’स्टाईलवर झाली होती पब्लिक फिदा !

By admin | Updated: May 21, 2015 00:30 IST

संजय तिपाले / सखाराम शिंदे , गेवराई ज्येष्ठ नेते माजी आ. माधवराव पवार यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकांत जाहीर सभांमधून पंडितांविरुद्ध रान पेटवले होते

संजय तिपाले / सखाराम शिंदे , गेवराईज्येष्ठ नेते माजी आ. माधवराव पवार यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकांत जाहीर सभांमधून पंडितांविरुद्ध रान पेटवले होते. दोन पंडित एकत्र आल्याने निर्माण झालेली रिअ‍ॅक्शन ‘कॅश’ करतानाच त्यांनी वयाच्या पासष्टीमध्येही तरुण नेत्यांना लाजवेल अशी तडाखेबंद भाषणे केली होती. त्यामुळेच स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी माधवराव पवारांचा उल्लेख ‘सिंघम’ असा केला होता. या आणि अशा कित्येक आठवणी गेवराईकरांनी बुधवारी ताज्या केल्या.राजकारणात स्वकीयांशी झुंज देत यश-अपयश पचविण्याची क्षमता ठेवणारे फार कमी नेते असतात. माधवराव पवार त्यापैकीच एक़ ते यशाने कधी हुरळून गेले नाही की अपयशाने डगमगून! एका बाजूला नात्याचे रेशीम बंध अन् दुसऱ्या बाजूला सोयऱ्यांसोबत राजकीय वैर... अशा दुहेरी भूमिकेतून ते जगले. ५ जुलै १९५० रोजी माधवरावांचा जन्म झाला. बी.ए. ची पदवी घेतल्यानंतर ते राजकारणाशी जोडले गेले. १९७२ मध्ये जि.प. सदस्य म्हणून त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली. ज्येष्ठ नेते शिवाजीराव पंडित यांना आस्मान दाखवत त्यांनी १९८० मध्ये आमदार होण्याचा मान मिळवला. त्यानंतरच्या निवडणुकीत शिवाजीराव पंडितांनी ‘हिसाब बराबर’ करत पवारांच्या विधानसभावारीला ‘ब्रेक’ लावला होता. पुढे शिवाजीराव पंडित यांचे चिरंजीव जयसिंह व माधवराव पवार यांची कन्या वृषाली यांचा विवाह झाला. त्यामुळे काही काळ त्यांच्यातील राजकीय वैर मावळले होते. पंडितांनी तालुक्यात तर पवारांनी शहरात सत्ता गाजवली. मात्र, नंतर त्यांच्यात पुन्हा सत्तासंघर्षाची ठिणगी पडली. दोन वर्षांपूर्वी गेवराईत माधवराव पवार, अ‍ॅड. लक्ष्मण पवार या पिता- पुत्रांनी स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीवेळी स्व. मुंडे यांच्या प्रचाराचा नारळ गेवराईत फोडला होता. या सभेत माजी आ. माधवराव पवार यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेत मुंडे यांना गेवराईतून सर्वाधिक मताधिक्य देण्याचा शब्द दिला होता. हा शब्द त्यांनी खरा करुन दाखवला होता. राष्ट्रवादीने केलेल्या टिकेला उत्तर देताना पवार यांनी ‘तुम्ही पिक्चरची भाषा काय करता? माझा धंदाच पिक्चर दाखविण्याचा आहे, १७ एप्रिलला मी तुम्हालाच पिक्चर दाखवतो’ असे ठणकावले होते. दोन पंडितांमधील एकीवर ‘मेरे फोटो को सीने से आज चिपकाले सैंय्या फेविकॉल से’ या गाण्यातून त्यांनी बोट ठेवले होते. या गाण्यानंतर पब्लिकमधून जोरदार शिट्ट्या, टाळ्या वाजवून प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे सभेचा नूरच पालटला होता. पवारांनी केलेल्या भाषणाला स्व. मुंडे यांनीही दाद दिली होती.माधवराव पवार यांना १९८० मध्ये आमदार होण्याची संधी मिळाली होती. दुसऱ्या टर्मला त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर त्यांनी शहरावर ‘होल्ड’ राखला;परंतु तालुक्यात दोन्ही पंडितांचीच चलती होती. विधानसभा निवडणुकीत माधवराव पवार यांचे पुत्र अ‍ॅड. लक्ष्मणराव यांनी मोठ्या मताधिक्क्यासह विजय नोंदवला. दोन्ही पंडितांविरुद्ध एकाकी लढा देत पवारांनी ३५ वर्षांनंतर तालुक्याची सत्ता पुन्हा काबिज केली. पुत्र लक्ष्मणराव यांच्या विजयात माधवराव पवार यांचा मोठा वाटा होता.