लातूर : लातूर विधानसभेच्या सहाही विधानसभा मतदारसंघात अपक्षांची भाऊगर्दी आहे. राजकीय पक्षांसह एकूण ९० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राजकीय पक्षांचे चिन्ह मतदारांना ज्ञात आहेत. पण अपक्षांचे चिन्ह कालच मिळाले असल्याने ते मतदारांपर्यंत पोहोचविण्याची उमेदवारांना कसरत करावी लागत आहे. शिट्टी, सिलेंडर, नारळ, विद्युत खांब, शिलाई मशीन, पत्रपेटी, कपाट, टेबल, अंगठी, टीव्ही, दिवा, कॉट, रिंग असे चिन्ह अपक्षांना मिळाले आहेत.लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात एकूण सात अपक्ष रिंगणात आहेत. त्यापैकी बालाजी ज्ञानोबा केंदाळे यांना ‘खाट’, अॅड. गणेश सुरेश गोमचाळे यांना ‘फलंदाज’, अंकुश नामदेव जाधव यांना ‘नारळ’, दत्ता किसन कोल्हे यांना ‘आॅटोरिक्षा’, धनाजी पांडुरंग भंडारे यांना ‘प्रेशर कुकर’, सय्यद मुबीन रहिमतुल्ला यांना ‘बॅटरी टॉर्च’, सुनील रानबा क्षीरसागर यांना ‘कपाट’ चिन्ह मिळाले आहे. अहमदपूर विधानसभा मतदारसंघात भारिप-बहुजन महासंघाचे अॅड. माधव कौळगावे यांना ‘कपबशी’, माजी मंत्री विनायकराव पाटील यांना ‘शिट्टी’, लायकोद्दीन काझी यांना ‘आॅटोरिक्षा’, गुणवंत पाटील यांना ‘अंगठी’, सिद्राम गायकवाड यांना ‘गॅस सिलेंडर’ आणि रज्जब पठाण यांना ‘नारळ’ असे चिन्ह मिळाले आहेत. निलंगा विधानसभा मतदारसंघात जनसुराज्य पार्टीचे माधवराव पाटील टाकळीकर यांना ‘नारळ’, महाराष्ट्र विकास आघाडीचे लिंबनअप्पा रेशमे यांना ‘गॅस सिलेंडर’, आंबेडकर राईट पार्टी आॅफ इंडियाचे संतोष ढाले यांना ‘कोट’, अन्वर हुसेन सय्यद यांना ‘पेनाची निब’, राजेंद्र कासळे यांना ‘टेबल’, विवेक बिरादार यांना ‘कपाट’, तुकाराम मुळे यांना ‘पत्रपेटी’, शौकतअली शेख यांना ‘कपबशी’, सत्यप्रकाश दिवे यांना ‘अंगठी’ चिन्ह मिळाले आहे. औसा विधानसभा मतदारसंघातील उद्धव क्षेत्रफळे यांना ‘रिंग’, अॅड. गोविंद सिरसाट यांना ‘पेन्सिल’, उमेश पवार यांना ‘इलेक्ट्रीकल पोल’, मनोहर पाटील यांना ‘शिलाई मशीन’, भास्कर संभाजी जाधव यांना ‘नारळ’, खंडेराव लिंबाजी भोजराज यांना ‘कपाट’, राजकुमार सूर्यवंशी यांना ‘टीव्ही’ असे चिन्ह मिळाले आहेत. (प्रतिनिधी)
शिट्टी, सिलेंडर अन् नारळही !
By admin | Updated: October 3, 2014 00:33 IST