जालना : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे शुक्रवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी ९ वाजता ते बदनापूर येथील बाजार समितीच्या मैदानावर जाहीर सभा घेणार असून, तेथून ते घनसावंगीला जाणार आहेत.पालकमंत्री राजेश टोपे यांच्या प्रचारार्थ त्यांची सभा होणार असून, तेथून ते भोकरदनला जाणार आहेत. त्याही ठिकाणी सभा होणार आहे.४पालकमंत्री राजेश टोपे, आ. चंद्रकांत दानवे व माजी नगराध्यक्ष बबलू चौधरी हे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समर्थकांनी दिली.