परभणी : शहरातील कारेगाव रोड भागातील एक विद्युत रोहित्र जळाल्याने या भागातील नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागली़ दरम्यान, वीज वितरण कंपनीने रोहित्र बदलल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजेच्या सुमारास वीजपुरवठा पूर्ववत झाला़ येथील कारेगाव रोड भागातील समझोता कॉलनी व इतर वसाहतींमधील वीजपुरवठा २६ आॅगस्ट रोजी सायंकाळी खंडीत झाला़ सायंकाळच्या सुमारास पाऊसही सुरू होता़ या भागातील नागरिकांनी हा वीजपुरवठा सुरळीत होईल म्हणून वाट पाहिली़ परंतु, रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही़ सकाळी देखील वीज आली नसल्याने नागरिकांनी कंपनीकडे तक्रार केली़ तेव्हा या भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न झाले़ त्यावेळी येथील विद्युत रोहित्र जळाल्याची बाब पुढे आली़ हे रोहित्र जळाल्यामुळे वीज वितरण कंपनीने पर्यायी स्वरुपात या भागात वीजपुरवठा सुरू केला़ त्यानंतर रोहित्र बदलण्याचे काम हाती घेतले़ रोहित्र जळाल्याने समझोता कॉलनीसह श्रीरामनगर, मंगलमूर्तीनगर या वसाहतींमधील वीजपुरवठा खंडीत झाला होता़ रात्री ८ वाजता गुल झालेली वीज दुपारी १ वाजेच्या सुमारास पूर्ववत झाली़ त्यामुळे येथील नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली़ मंगळवारी रात्री शहर व परिसरात पावसाची भूरभूर सुरू होती़ त्यातच वीजपुरवठा गायब झाल्यामुळे नागरिकांना उकाड्याने त्रस्त केले़ पाऊस असल्याने घरातच अंधारामध्ये रात्र काढावी लागली़ (प्रतिनिधी)
सतरा तास विद्युत पुरवठा गूल
By admin | Updated: August 27, 2014 23:45 IST