कन्नड : तालुक्यातील दिगाव येथील जवान सारंगधर किसन सुसुंद्रे हा आसाममधील गोहाटी येथे गोळीबारात ठार झाला. दिगावचे सरपंच विठ्ठल सुसुंद्रे यांनी सांगितले की, सारंगधर (३३) सुमारे १२-१३ वर्षांपूर्वी सैन्यात भरती झाला होता आणि सध्या तो आसाममध्ये गोहाटी येथे १०३ इंजिनिअरिंग विभागात होता. त्याची बदली पंजाबमध्ये झाली होती. मात्र गणेशोत्सवामुळे तो आसाममध्येच होता. त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील, दोन मुले व भाऊ असा परिवार आहे. त्याच्या निधनाचे वृत्त कळताच गावावर शोककळा पसरली. त्याचे पार्थिव शुक्रवारी दिगाव येथे पोहोचेल व येथेच पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
दिगावचा जवान आसामात शहीद
By admin | Updated: September 5, 2014 00:51 IST