औरंगाबाद : पिसादेवी परिसरात शनिवारी पहाटे दरोड्याच्या तयारीत असलेल्या ५ जणांच्या टोळीला सिडको पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले होते. त्यावेळी दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यातून निसटले होते. त्या आरोपींच्या शोधार्थ तसेच जप्त करण्यात आलेले पिस्टल आरोपींनी कोठून विकत घेतले होते, त्या व्यक्तीला अटक करण्यासाठी सिडको ठाण्याचे एक पोलीस पथक मंगळवारी रात्री मध्यप्रदेशकडे रवाना झाले. सिडको ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील फौजदार गोरख चव्हाण, कर्मचारी सुखदेव जाधव, मिलिंद भंडारी, दीपक शिंदे व अरुण उगले या पाच जणांचे पथक आरोपी अमोल पानकडे यास सोबत घेऊन मध्यप्रदेशातील शेंदवाकडे रवाना झाले आहे. शनिवारी पहाटे पिसादेवी रोडवर अमोल सुरेश पानकडे (२२, रा. गंगापूर), राकेश सुरेश चावरिया (१९, रा. गंगापूर), स्वप्नील गणेश गायकवाड (२०, रा. गंगापूर), श्रीकांत बारकू दुशिंग (२३, रा. नवीन कायगाव) आणि शेख सादिक शेख रफिक (२०, रा. पेंढापूर, ता. गंगापूर) या पाच गुन्हेगारांना अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी टीव्हीएस अपाची (क्रमांक एमएच-२० सीजे-७८७०) आणि काळ्या रंगाची बजाज पल्सर (एमएच-२० सीडब्ल्यू-४१९५) अशा दोन दुचाकी जप्त केल्या होत्या. याशिवाय आरोपींच्या ताब्यातून देशी बनावटीचे ७.६५ एम.एम.चे गावठी पिस्टल, चार जिवंत काडतुसे, एक रामपुरी चाकू, दोन फायटर, लाकडी दांडा, नायलॉन दोरी व मिरची पावडर, अशी गुन्हा करण्यासाठी वापरली जाणारी सामुग्रीही जप्त करण्यात आली होती. आरोपी अमोल पानकडेही सोबतआरोपींनी देशी बनावटीचे ७.६५ एम.एम.चे गावठी पिस्टल हे शेंदवा येथून आणल्याचे पोलिसांना सांगितले होते. पिस्टल शेंदवा येथून कोणाकडून घेतले होते, त्याचा शोध घेण्यासाठी आज मंगळवारी आरोपी अमोल पानकडे यास सोबत घेऊन पोलिसांचे पथक मध्यप्रदेशकडे रवाना झाले आहे.
आरोपींच्या शोधार्थ पोलीस म.प्र.कडे
By admin | Updated: July 2, 2014 01:02 IST