शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
4
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
5
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
6
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
7
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
8
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
9
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
10
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
11
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
12
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
13
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
14
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
15
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
16
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
17
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
18
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

देखाव्यांची जय्यत तयारी

By admin | Updated: August 25, 2014 23:59 IST

जालना: शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वर्षानुवर्षांपासून परंपरा असणाऱ्या गणेश मंडळांनी याही वर्षी सामाजिक आशयाच्या अनुषंगाने देखाव्यांची भक्कम तयारी सुरू केली आहे.

जालना: शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वर्षानुवर्षांपासून परंपरा असणाऱ्या गणेश मंडळांनी याही वर्षी सामाजिक आशयाच्या अनुषंगाने देखाव्यांची भक्कम तयारी सुरू केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा दुष्काळाने होरपळून निघाला आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी पावसाअभावी भीषण दुष्काळीस्थिती त्या पाठोपाठा गेल्यावर्षी गारपिटीचा सर्व सामान्य शेतकऱ्यांना मोठा तडाखा बसला. याही वर्षी अपुरा पाऊस दुष्काळी सदृशस्थितीस कारणीभूत ठरतो आहे. त्याचा परिणाम गणेशोत्सवावर उमटतो आहे. नेहमीप्रमाणे याहीवर्षी गणेशोत्सवावर दुष्काळसदृश्य स्थितीचे सावट आहे. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या गणेशोत्सवात यावर्षी बऱ्यापैकी उत्साह जाणवेल, असा अंदाज आहे. शहरासह जिल्ह्यातील गणेश मंडळांनी लोकवर्गणीतून परंपरेप्रमाणे सामाजिक व धार्मिक आशयांचे देखावे उभारण्यासंदर्भात युद्ध पातळीवर काम सुरु केले आहे. याही वर्षी हे देखावे सर्व सामान्य नागरिकांच्या दृष्टिने लक्षवेधी ठरतील अशी चिन्हे आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही देखाव्यांमधून त्या त्या संघटनांसह सत्तारुढ व विरोधी पक्षांचे पदाधिकारी राजकीय संदेश सुद्धा देतील असे चित्र आहे. मूलभूत सोयी सुविधांचे प्रश्न, पाणीटंचाई, शहरी व ग्रामीण भागातील तासन्तास वीज भारनियमनाचा प्रश्न तसेच दुष्काळी स्थिती, शेतकऱ्यांवरील सुलतानी व अस्मानी असे संकट तसेच अंधश्रद्धांवरील देखावे सुद्धा या गणेशोत्वात लक्षवेधी ठरतील, अशी चिन्हे आहेत. जालना शहरातील काही गणेश मंडळांकडून धार्मिक आशयांची देखावे सादर होत आले आहेत. विशेषत: नवीन जालना भागातील नवयुवक गणेश मंडळ, ज्योती गणेश मंडळ, लोकमान्य टिळक गणेश मंडळ, तेली समाज गणेश मंडळ, आदर्श गणेश मंडळ तर जुना जालना भागातील चमनचा राजा, श्री ज्ञानेश्वर गणेश मंडळ, मंमादेवी गणेश मंडळ आदी गणेश मंडळांकडून याही वर्षी सुंदर असे धार्मिक देखावे सादर होतील, असे चित्र आहे. काही मंडळांनी प्रसिद्ध मंदिरासह कलाकृतींची प्रतिके सादर केली आहेत. ती मंडळीसुद्धा याही वर्षी जालनेकरांना सुंदर अशा प्रतिकृती सादर करुन त्यांचे लक्ष वेधून घेतील, असे चित्र आहे. भडकलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर देखावे सादर करणे सुद्धा दिवसेंदिवस जिकिरीचे बनत आहे. साहित्याचा खर्च, वाहतुकीचा खर्च, कलावंतांचे मानधन तसेच अन्य सुविधा उपलब्ध करणे, मंडळांना दिवसेंदिवस अडचणीचे असे ठरते आहे. परंतु त्यातूनही मार्ग काढून गणेश मंडळे यावर्षी उत्तम असे देखावे, सादर करतील असे चित्र आहे. गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेश मंडळांनी मंडप उभारणीचे काम युद्ध पातळीवर सुरु केले आहे. आता एखाद दोन दिवसांत कलावंतांद्वारे प्रत्यक्ष देखावे उभारण्याचे काम सुरु होईल, व गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी देखाव्यांचे काम पूर्ण होईल. दुसऱ्या दिवशी हे देखावे सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले होतील. असे चित्र आहे. (प्रतिनिधी)