सावंत म्हणाले, साष्ट पिंपळगाव येथे २० जानेवारीपासून गावकरी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परिसरातील अनेक गावांतील मराठा समाज तिथे जात आहे. मराठा आरक्षण लढाईमध्ये समाजातील ४२ बांधवांनी आत्मबलिदान दिले. १३ हजार ७२६ आंदोलनकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविले. एवढे सगळे होऊनही सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली. यानंतर स्थगिती उठविण्यासाठी शासनाने भरीव कोणतेही काम केले नाही. उलट नोकरभरती जाहीर केली. आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत राज्य शासनाने नोकरभरती स्थगित करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. साष्ट पिंपळगाव येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी औरंगाबाद मराठा क्रांती मोर्चातर्फे १ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पिंपळगाव येथून मशाल रॅलीला सुरुवात होईल. दुपारी तीन वाजता औरंगाबादेतील चौकात मशाल रॅलीचा समारोप होईल. यानंतर तेथेच ठिय्या आंदोलन सुरू केले जाईल. या पत्रकार परिषदेला अमोल साळुंके, सुभाष भोसले, गणेश उगले, प्रदीप नवले, आदींची उपस्थिती होती.
मराठा क्रांती मोर्चाची सोमवारी साष्ट पिंपळगाव ते औरंगाबाद मशाल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:20 IST