शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
3
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
4
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
5
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
6
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक
7
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
8
एपीएमसीच्या १७९ एकर जमिनीवर कोणाचा डोळा? नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हलणार?
9
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
10
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
11
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
12
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
13
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
14
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
15
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
16
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
17
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
18
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
19
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
20
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...

कन्नडच्या नगराध्यक्षपदी संतोष कोल्हेंची हॅट्ट्रिक!

By admin | Updated: July 11, 2014 01:04 IST

कन्नड : नगर परिषद अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे संतोष कोल्हे यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

कन्नड : नगर परिषद अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे संतोष कोल्हे यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. तथापि, निवड झाल्याची औपचारिक घोषणा दि. १७ जुलै रोजी करण्यात येईल.नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या वेळेअखेर संतोष कोल्हे या एकमेव उमेदवाराने सहा नामनिर्देशनपत्रे दाखल केली. दुपारी तीन वाजता प्राप्त नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात आली. छाननीअंती संतोष कोल्हे यांचे नामनिर्देशनपत्र वैध ठरले. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. या निवडीमुळे संतोष कोल्हे हे सलग तिसऱ्यांदा नगराध्यक्ष झाले आहेत.पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी राजीव नंदकर, सहायक म्हणून नायब तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी डी.बी. निलावाड, तलाठी विकास वाघ यांनी काम पाहिले. बिनविरोध निवड झाल्याबद्दल नगरसेवक व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष साजरा केला. याप्रसंगी न.प.तील काँग्रेसचे गटनेते वाल्मीक लोखंडे, नगरसेवक सुनील पवार, विक्रम पाटे, साहेबखाँ पठाण, रौफ मामू, कैलास जाधव, नरेंद्र शर्मा, सय्यद सालार, रवी राठोड, तेजपाल जैन, अक्कू पवार, प्रेमसिंग बैनाडे आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. (वार्ताहर)वैजापूरच्या नगराध्यक्षपदी पुन्हा काँग्रेसच्याच शिल्पा परदेशी वैजापूर : वैजापूर नगरपालिकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या शिल्पा दिनेश परदेशी यांची बिनविरोध निवड झाली. वैजापूर नगरपालिकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची १७ जुलै रोजी निवडणूक होती. ९ व १० जुलै असे दोन दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ठेवण्यात आले होते; परंतु या दोन दिवसांत फक्त काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिल्पा परदेशी यांचाच एकमेव उमेदवारी अर्ज नगरपालिकेचे मुख्याधिकारी बी. यू. बिघोत यांच्याकडे प्राप्त झाला. अन्य कोणत्याही राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. नगरपालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट बहुमत असल्याने या पदावर त्यांच्याच उमेदवाराची निवड होणार होती. त्यामुळे सेनेने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचीही तसदी घेतली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीकडे १२ जागा आहेत, तर सेनेकडे फक्त ९ जागा आहेत. शिल्पा परदेशी यांच्यासाठी सेना नेत्यांचीही मूकसंमती होती. त्यामुळे शिल्पा परदेशी यांचा मार्ग मोकळा झाला अन् त्यांना या पदावर दुसऱ्यांदा विराजमान होण्याची संधी मिळाली.२०११ मध्ये नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर शिल्पा परदेशी यांच्याच गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडली. त्यावेळी नगराध्यक्ष पद हे इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव होते. परदेशी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. त्यांच्या या निवडीचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, डॉ. दिनेश परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, उल्हास ठोंबरे, दशरथ बनकर, लता व्यवहारे, सुनीता जगताप, अफरोज काझी, संगीता गायकवाड, संदीप टेके, सुरेखा धुमाळ, रामदास टेके, मजीद कुरेशी, गोविंद धुमाळ, राजूसिंह राजपूत आदींनी स्वागत केले. आता १७ जुलै रोजी विशेष सभेची औपचारिकता बाकी आहे. या दिवशी उपाध्यक्षपदाची निवड होईल.पैठण : पैठणच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल करण्याच्या गुरुवारी शेवटच्या दिवशी ३ नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यात दोन शिवसेना व काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. दि. १७ रोजी नगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी न.प.च्या सभागृहात विशेष सभा घेण्यात येणार आहे. नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल करण्याची आज दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत होती. दरम्यान, दुपारी १ वाजता शिवसेनेचे दत्ता गोर्डे यांनी नगराध्यक्षपदासाठी ४ उमेदवारी अर्ज दाखल केले, तर विद्यमान उपनगराध्यक्ष जितसिंग करकोटक यांनी २ व शिवसेनेच्या गटनेत्या राखी परदेशी यांनी २ उमेदवारी अर्ज शेवटच्या तासात दाखल केले.राखी परदेशी यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर सूचक व अनुमोदक म्हणून काँग्रेसच्या नगरसेवकांनी सही केली आहे. काँग्रेसचे नगरसेवक सोमनाथ भारतवाले व सुधाकर तुपे हे राखी परदेशी यांचे सूचक व अनुमोदक झाले आहेत. शिवसेनेची उमेदवारी दाखल करणारे नगरसेवक दत्ता गोर्डे यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपाच्या सुवर्णा रासणे, सेनेच्या मंगल मगर, ललिता पोरवाल यांच्या स्वाक्षऱ्या आहेत, तर विद्यमान उपनगराध्यक्ष जितसिंग करकोटक यांच्या उमेदवारी अर्जावर राजूभाई वीटभट्टीवाले, फाजल टेकडी, इनाम अन्सारी या काँग्रेसच्या नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. काँग्रेसचे नगरसेवक शिवसेनेच्या उमेदवार राखी परदेशी यांना सूचक अनुमोदक झाल्याने काँग्रेसचे गटनेते अजीम कट्यारे यांनी दु:ख व्यक्त करीत नगरसेवकांनी पक्षनिष्ठा बाळगावी, असे आवाहन केले आहे.नगरसेवक सहलीवरनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस व शहर विकास आघाडीचे बहुसंख्य नगरसेवक शहरातून भूमिगत झाले आहेत. हे नगरसेवक पंढरपूरला दर्शनासाठी गेल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत असले तरी ते राजकीय सहलीवर गेल्याची शहरभर चर्चा आहे. ४ ते ५ नगरसेवक शहरात आहेत. (वार्ताहर)गंगापुरात दोन अर्ज दाखलगंगापूर : गंगापूरच्या नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. ही निवडणूक १७ तारखेला होत असून यासाठी पीठासीन अधिकारी संजीव जाधवर यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या नगरसेविका नंदाबाई अशोक खाजेकर, तर आ. प्रशांत बंब आघाडीतर्फे नगरसेविका नीलम संदीप खाजेकर यांनी दुपारी १ वाजता उमेदवारी अर्ज दाखल केले. गंगापूर नगर परिषदेवर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व असून गेली अडीच वर्षे संजय जाधव यांनी नगराध्यक्षपद भूषविले. नगर परिषदेतील पक्षीय बलाबल पुढीलप्रमाणे. काँग्रेस ११, शिवसेना ४, आ. बंब आघाडी २, असे एकूण १७ नगरसेवक आहेत.