जालना : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही संततधार पाऊस झाल्याने सूर्यदर्शन झाले नाही. जिल्ह्यात ४२.४६ मि. मी. पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १८६.९४ मि. मी. पाऊस पडला आहे.जालना जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे. त्यातच या वर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीला जून महिन्यात जिल्ह्यात काही ठिकाणीच जोरदार पाऊस पडला. त्यानंतर सुमारे ५० दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारपासून जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले. पावसाने दिलेल्या उघडिपीमुळे पाण्याअभावी जिल्ह्यात दुबारपेरणीचे संकट ओढावले होते. अनेक ठिकाणी खरिपाची पेरणी वाया गेलेली आहे. त्यामुळे मंगळवारपासून पावसाचे पुनरागमन झाल्याने जिल्ह्यातील काही भागातील शेतकऱ्यांनी दुबार पेरणीसाठी आणखी पावसाच्या प्रतिक्षेत आहे.जिल्ह्यात मंगळवारी पडलेल्या पावसाची प्रशासनाने घेतलेली नोंद. (कंसात आतापर्यंतचा पाऊस) जालना तालुका - ४५.१३, (१९१.४३), भोकरदन- ५७.७५, (२५०.९४), जाफराबाद- ६१.८०, (१८१.६), बदनापूर- २८.६०,(१७५.०२),परतूर- ३५.४०, (२००.६), अंबड- २६.००, (१४९.२७), घनसावंगी- ३१.००, (१२६.१४), मंठा- ५४.००, (२२४.०१) एकूण ४२.४६, (१८६.९४) मि. मि. पाऊस पडल्याची नोंद आहे.जालना जिल्ह्यात जून ते आॅक्टोबर पावसाची वार्षिक सरासरी ६८८.२१ आहेत. त्यानुसार आज पर्यंत ३४४.११ मि.मी. म्हणजे ५४.५६ टक्के पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात आता पर्यंत जिल्ह्यात १८६.९४ मि. मी. म्हणजे २७.२७ टक्के पाऊस पडल्याची नोंद आहे.दोन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या रिमझीम पावसामुळे रस्त्याची पार दुरवस्था झाली आहे. अग्रसेन चौक ते भोकरदन नाका, मुथा बिल्डींग ते महावीर चौक, विठ्ठल मंदीर ते अण्णाभाऊ साठे चौक, स्वामी विवेकानंद चौक ते उड्डाणपूल या मुख्य रस्त्यासह शहरातील अनेक मार्गावर खड्ड््यांचे साम्राज्य पसरले आहे.
दुसऱ्या दिवशीही संततधार
By admin | Updated: August 6, 2015 00:04 IST