अंबड : गोदापात्रातून वाळुचा अवैध वाळुचा उपसा करणारी ९ वाहने महसूल व आरटीओंच्या संयुक्त पथकाने गेल्या दोन दिवसांत पकडली. त्यातील ३३ ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे.२७ व २८ जानेवारी रोजी महसूल व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीमंत हारकर व तहसीलदार महेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार करण्यात आली. या दोन्ही पथकांनी तालुक्यातील सुखापुरी, सुखापुरी फाटा, सोनक पिंपळगांव, अंबड, पारनेर फाटा, मार्डी, रोहिलागड, दोदडगांव, कुरण, पाथरवाला, गोंदी आदी ठिकाणी कारवाई करत अवैध वाळु वाहतूक करणाऱ्या हायवा, टिप्पर, भुसार मालाची वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टर अशी एकूण ९ वाहने पकडली. ही सर्व वाहने वडीगोद्री- पाचोड मार्गे औरंगाबाद, सुखापुरी-सुखापुरी फाटा-सोनकपिंपळगांव - वडीलासुरा- पाचोड मार्गे औरंगाबाद, पारनेर फाटा- रोहिलागड मार्गे औरंगाबाद, मार्डी - रोहिलागड मार्गे औरंगाबाद तसेच अंबड मार्गे जालना येथे जात होती.ही कारवाई तहसिलदार महेश सावंत यांच्यासह नायब तहसिलदार अमित पुरी, नायब तहसिलदार पी.सी.उघडे, मंडळ अधिकारी ऐडके, मिरासे, तलाठी बी.ई.भुसारे, डी.जी.कुरेवाड, ए.ए.देशमुख, काशिद, पी.यु.काटकर, सिनगारे, एस.सी.चाटे, जे.ई.वाल्हेकर आदींच्या पथकाने केली. (वार्ताहर)लोकमतमध्ये वाळूमाफियांचे वृत्त प्रसिद्ध होताच उपप्रादेशिक परिवहन निरीक्षक किरण लोंढे यांच्या पथकाने गुरुवारी वाहनांवर कारवाई करीत साडेतीन लाखांचा दंड ठोठावला. ४एम.एच.०४-३२७२ (३ ब्रास), एम.एच.२८-बी.८३५४ (३ ब्रास), एम.एच.२०-९३०९ (३ ब्रास), एम.एच.२० -सी.टी.७८६६ (८ ब्रास), एम.एच.२०-सी.टी.३६०५ (३ ब्रास), एम.एच.२१-५४५९ (३ ब्रास), एम.एच.१४-बी.जे.२४२९ ( ४ ब्रास), एम.एच.०४-सी.जी. १५८५ (३ ब्रास), एम.एच.२०-बी.टी.-४९२४ (३ ब्रास) वाळू जप्त केली.
वाळूमाफिया रडारवर !
By admin | Updated: January 30, 2015 00:49 IST