औरंगाबाद : गणेशोत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर शनिवारी अर्ध्या शहरात पोलिसांनी पथसंचलन केले. या पथसंचलनात राज्य राखीव दलाच्या जवांनासह ५ पोलीस निरीक्षक, २५ फौजदार आणि सशस्त्र कर्मचारी सहभागी झाले. याशिवाय रेल्वेस्टेशनची अचानक बॉम्बशोधक पथक, दहशतवादविरोधी पथकाकडून तपासणी करण्यात आली.गणेशोत्सवाचे आता शेवटचे चार दिवस राहिले आहेत. शिवाय ईद साजरी होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास करावयाच्या उपाययोजनांतर्गत पोलिसांनी मुकुंदवाडी, कामगार चौक, सिडको एन-२, पुंडलिकनगर, गजानन महाराज मंदिर, जवाहरनगर, गारखेडा, शिवाजीनगर, सातारा परिसर, देवळाई चौक , बीड बायपास, छोटा मुरलीधरनगर मार्गे उस्मानपुरा पोलीस ठाणे या मार्गावर पथसंचलन केले. या पथसंचलनात जवाहरनगर ठाण्याचे निरीक्षक मनीष कल्याणकर, मुकुंदवाडीचे निरीक्षक नाथा जाधव, पुंडलिकनगरचे निरीक्षक अनिल आढे, साताऱ्याचे निरीक्षक भारत काकडे, उस्मानपुऱ्याचे निरीक्षक सतीश टाक आणि २५ फौजदार, सहायक पोलीस निरीक्षक, १२५ पोलीस जवान, एसआरपीएफचे सशस्त्र जवान, वज्र वाहनांसह सहभागी झाले.
अर्ध्या शहरात पोलिसांचे पथसंचलन
By admin | Updated: September 11, 2016 01:23 IST