दरवर्षी दिवाळी सणानंतर लग्नसराई सुरू होते. यासाठी लागणारे वाहनांना या कालावधीत चांगली मागणी असते. त्यात अनेक तरुण बॅंकांकडून फायनान्स घेत चारचाकी वाहन घेतात. लग्नसराईत चांगला व्यवसाय होत असल्याने ते वाहनांचे हप्ते फेडून कमाईदेखील करतात. परंतु कोरोना महामारीमुळे गेल्यावर्षीदेखील लग्नसराई बंद होती, तर यंदाही खासगी वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे हप्ते कसे भरायचे, व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे वाहने जप्त होण्याची प्रकरणे ग्रामीण भागात घडू लागली आहे. हातातला व्यवसाय गेल्याने उपासमारीची वेळ आली आहे.
कोट
मी लग्नसराई व इतर खासगी भाडे मारण्यासाठी पंधरा महिन्यांपूर्वी क्रुझर गाडी घेतली सुरुवातीला नवीन गाडीमुळे दूरदूरचे भाडे मिळाले. यात मागील वर्षी लग्नसराई बहरात असताना लॉकडाऊन झाला. यात माझी गाडी सहा महिने जागेवर उभी राहिली. हप्ते थकले. उसनवारी करून हप्ते रुळावर आणले पुन्हा लग्नसराई सुरू होताच लग्नसोहळ्यावर निर्बंध आले. या लग्नसराईत माझ्या गाडीला १५ लग्नांचे भाडे बुक झाले होते. परंतु कोरोना व निर्बंधामुळे काहींनी लग्न पुढे ढकलले यात आता माझ्या गाडीचे दोन हप्ते थकले आहे.
...अजर शेख, लाडसावंगी, वाहनमालक
माझ्याकडे दीड एकर शेती आहे. शेती करून व शेतीला जोड धंदा म्हणून शेतीवर कर्ज घेऊन चारचाकी वाहन घेतले, परंतु लॉकडाऊन निर्बंध आदींमुळे लोक गावाबाहेर अथवा देवधर्म वारी आदी करणे सोडून दिल्याने माझे वाहन मागील सहा महिन्यांपासून उभे आहे. शिवाय बँकेचे हप्ते थकले व्याज वाढत असल्यामुळे आता हालअपेष्टा सहन कराव्या लगत आहे.
बाळासाहेब पवार, लाडसावंगी, वाहनमालक
मी बदलीवर वाहने चालवतो, परंतु मागील वर्षापासून बदली वाहन चालविण्यासाठी वाहने बाहेर जात नसल्याने काम मिळत नाही, शिवाय घर कसे चालवावे? असा प्रश्न उभा राहिला आहे.
राजू फुलसौंदर वाहनचालक