परभणी : लोकमत बालविकास मंचच्या सदस्य नोंदणीला प्रारंभ झाला असून, नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे़ विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम बालविकास मंचने केले आहे़ या मंचच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात़ प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही सदस्य नोंदणी १६ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे़ मनोरंजन, प्रबोधन आणि स्पर्धात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बालविकास मंचने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे़ त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सदस्य नोंदणी करावी, असे आवाहन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले आहे़ सदस्य नोंदणी केल्यानंतर लगेच एक आकर्षक गिफ्ट, लकी कुपन, सक्सेस स्टोरी बुक आणि ओळखपत्र दिले जाणार आहे़ लकी कुपनद्वारे अनेक बक्षिसे मिळण्याची संधी विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे़ १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबरपर्यंत हे कुपन त्या त्या दुकानात जमा करावयाचे आहेत. बालविकास मंचच्या कार्यक्रमामध्ये लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे़ तसेच राज्यस्तरीय लकी ड्रॉमध्ये लॅपटॉप जिंकण्याची संधी सदस्यांना मिळणार आहे़ तेव्हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी बाल विकास मंचची सदस्य नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)
बालविकास मंच सदस्य नोंदणीला प्रतिसाद
By admin | Updated: September 20, 2014 23:40 IST