शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

तुळजापूर शहर बंदला प्रतिसाद

By admin | Updated: March 5, 2015 00:01 IST

तुळजापूर : तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे चालविण्यात येणाऱ्या तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संलग्नीकरणाकरिता प्रतिवर्षी एआयसीईटीचे रिन्यूअल

तुळजापूर : तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे चालविण्यात येणाऱ्या तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संलग्नीकरणाकरिता प्रतिवर्षी एआयसीईटीचे रिन्यूअल शुल्क भरणे गरजेचे असते. परंतु यंदा दोन वेळा फी भरण्याची वाढीव मुदत मिळूनही फी भरली गेली नाही. यामुळे सदर महाविद्यालय बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे सांगत, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालय बचाव समितीच्या वतीने तुळजापूर बेमुदत बंद पुकारण्यात आला. याला बुधवारी शहरवासीयांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह शहरातील व्यापारी, पुजारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बुधवारी येथील पुजारी मंडळाच्या सभागृहात बैठक झाली. महाविद्यालय संलग्नीकरणाकरिता प्रतिवर्षी एआयसीईटीचे रिन्यूअल शुल्क भरणे आवश्यक असते. गुरुवार ५ मार्च ही शुल्क भरण्याची अंतिम तारीख आहे. या प्रस्ताव व शुल्क भरण्यावर महाविद्यालयाच्या अध्यक्षांच्या स्वाक्षरीची आवश्यकता असते. परंतु अध्यक्षांनी चालू वर्षीचा प्रस्ताव व शुल्क अद्यापही दाखल केला नसल्याचा आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला. पुढील वर्षाची महाविद्यालयाची प्रक्रिया बंद पडण्याची शक्यता गृहित धरून सर्वानुमते बेमुदत शहर बंद करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर सायंकाळी सातपासून शहर बंद करण्यात आले. या बैठकीस माजी नगराध्यक्ष भाई प्रकाशराव देशमुख, सुधीर कदम, अमर हंगरगेकर, किरण खपले, किशोर गंगणे, मिलींद रोकडे, राजाभाऊ माने, प्रकाश धट, दिलीप गंगणे, उत्तम अमृतराव, भारत कदम, ऋषी मगर, उपाध्यक्ष गणेश कदम, सुहास साळुंके, विशाल रोचकरी, भारत कदम, इंद्रजित साळुंके, जयवंतराव कांबळे, दयानंद हिबारे, प्रा. हेमंत वडणे, महेश चोपदार, दिलीप मगर, बबलू सूर्यवंशी, समाधान कदम, द्विग्वीजयसिंह पाटील, विजय कंदले, विश्वजित पाटील, अ‍ॅड. धीरज पाटील आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय बंद पडू नये असेच प्रशासनाचे प्रयत्न आहेत. त्यामुळे महाविद्यालयाला गतवैभव मिळवून देण्यासाठी आम्ही अनेक पावले उचलली आहेत. संलग्नीकरणाकरिता ३७ लाख रुपये शुल्क भरावयाचे आहेत. मात्र त्यासाठीची विशिष्ठ प्रक्रिया आहे. संस्थानचा अध्यक्ष असलो तरी, एवढी मोठी रक्कम भरण्याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार मला एकट्याला नाहीत. सदर रक्कम भरण्याचा प्रस्ताव संस्थानच्या सर्वसाधारण सभेत ठेवून त्याला मंजूरी घेणे आवश्यक आहे. आमदार मधुकरराव चव्हाण यांचेसोबतही याविषयावर चर्चा झाली असून, याबाबतचा प्रस्ताव लवकरच विश्वस्त समितीसमोर ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले. केवळ शुल्क भरले नाही. म्हणून महाविद्यालय बंद पडणार नाही. महाविद्यालयाची गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्वांना पुढाकार घ्यावा लागणार आहे. यासाठी पुढाकार घेण्याऐवजी महाविद्यालय बंद पडणार अशी अफवा पसरविण्यात येत आहे. हा प्रकार चुकिचा असून अशा प्रवृत्तीविरोधात कारवाई करण्यात येईल. असा इशाराही जिल्हाधिकारी नारनवरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.