शहरं
Join us  
Trending Stories
1
Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं
2
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त
3
Pune Accident Video: कार थांबली, ते जवळ गेले अन् पाठीमागून...; काळजाचा ठोका चुकवणारा अपघात
4
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट ओपनिंग; सेन्सेक्स ७० अंकांनी वधारला, मेटल-ऑटो शेअर्समध्ये घसरण
5
BJP New President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष महिला? निर्मला सितारामन यांच्यासह 'ही' ३ नावे चर्चेत!
6
महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन, चालवली बंगळुरूत; फरारीच्या मालकाला भरावा लागला १.४२ कोटींचा टॅक्स; प्रकरण काय?
7
Post Office च्या PPF स्कीममध्ये महिन्याला ₹२००० जमा कराल तर १५ वर्षांनंतर किती रक्कम मिळेल, पैसेही राहतील सुरक्षित
8
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
9
शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर पती पराग त्यागीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला- "आजूबाजूच्या अफवांमध्ये.."
10
"गरीब हिंदूंना कशाला मारताय? हिंमत असेल तर नळबाजार, मोहम्मद अली रोड येथे जाऊन…’’, नितेश राणेंनी दिलं आव्हान 
11
"एअर इंडियाने कोलंबोला जातोय, इच्छापत्र बनवून ठेवलंय...", प्रसिद्ध अभिनेत्याने शेअर केला Video
12
Today Daily Horoscope: कोणत्या राशीला आज धनलाभाचा योग? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
13
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
14
पदवी आहे, पण काम भलतेच! नोकरीचे वास्तव; पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेमधून समोर
15
रायकर पाड्यातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास; वैतरणा नदी तराफ्यावरून करावी लागते पार
16
पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत
17
उद्धव-राज : जुन्या जखमांचा हिशेब कसा होणार?
18
यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे
19
कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
20
लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

संशोधन प्रक्रियेसमोर आरक्षणाचा पेच उभा

By admin | Updated: December 22, 2014 00:03 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामार्फत संशोधन प्रक्रिया गतिमान करण्यात आली असली तरी या प्रक्रियेसमोर मराठा व मुस्लिम आरक्षणाबरोबरच मार्गदर्शकांचाही मोठा पेच निर्माण झाला आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामार्फत संशोधन प्रक्रिया गतिमान करण्यात आली असली तरी या प्रक्रियेसमोर मराठा व मुस्लिम आरक्षणाबरोबरच मार्गदर्शकांचाही मोठा पेच निर्माण झाला आहे. ‘पेट-३’मध्ये जवळपास साडेतीन हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेच्या वेळीच राज्य सरकारने मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण लागू करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर महिनाभरातच न्यायालयाने या समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिली. मात्र, शासनाकडून यासंबंधी विद्यापीठाला कसल्याही मार्गदर्शक सूचना प्राप्त न झाल्यामुळे प्रशासनाने मराठा व मुस्लिम समाजाचे आरक्षित विद्यार्थी वगळून प्रमाणपत्र वितरणाला सुरुवात केली. त्यानंतर काही विद्यार्थी संघटनांनी या दोन्ही समाजाच्या विद्यार्थ्यांना पेट पात्रता प्रमाणपत्र देण्याची मागणी लावून धरली. त्यामुळे प्रशासनाने विधि तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर न्यायालयाच्या पुढील निर्णयाच्या अधीन राहून मराठा व मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना ‘पेट-३’ प्रमाणपत्र वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. जवळपास ४०० विद्यार्थ्यांना या प्रमाणपत्रांचे वाटप सुरू आहे. दुसरीकडे विद्यापीठाने संशोधन प्रक्रिया सुरू केली. जे संशोधन करण्यास इच्छुक आहेत, त्यापैकी ‘पेट-३’ उत्तीर्ण, नेट-सेट उत्तीर्ण, एम.फिल., विविध फेलोशिप प्राप्त, कार्यरत प्राध्यापक आदींना २६ डिसेंबरपर्यंत आॅनलाईन नोंदणी करण्याची मुदत आहे. यासाठी विद्यापीठाने या सर्व घटकांचा ‘कोटा’ निश्चित केलेला असला तरी अलीकडेच सर्वोच्च न्यायालयानेही या दोन्ही समाजाला आरक्षण नाकारले आहे. त्यामुळे मराठा व मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांना या प्रक्रियेत आरक्षण द्यायचे की नाही, याबद्दल अद्यापही राज्य शासनाकडून विद्यापीठाला मार्गदर्शक सूचना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे प्रशासनासमोर संशोधन प्रक्रियेत आरक्षणाचे काय करायचे, याबद्दलचा मोठा पेच निर्माण झालेला आहे. दुसरीकडे विद्यापीठाबाहेरील काही संस्था, उद्योगांमधील तज्ज्ञांची मार्गदर्शक म्हणून निवड करण्याचा निर्णय झाला असला तरी अद्याप तो अमलात आलेला नाही.