शहरं
Join us  
Trending Stories
1
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
2
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; समोर आला थरकाप उडवणारा VIDEO
3
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
4
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
5
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
6
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
7
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
8
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
9
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
10
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
11
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
12
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
13
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
14
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
15
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
16
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
17
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
18
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
19
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
20
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका

लग्नासाठी तगादा; पे्रयसीचा केला खून

By admin | Updated: June 25, 2016 00:44 IST

औरंगाबाद : चिकलठाणा गायरानमधील आठवडी बाजारालगतच्या नाल्यात १६ जून रोजी जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या महिलेच्या खुनाचे

औरंगाबाद : चिकलठाणा गायरानमधील आठवडी बाजारालगतच्या नाल्यात १६ जून रोजी जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या महिलेच्या खुनाचे गूढ उकलण्यात अखेर पोलिसांना शुक्रवारी यश आले. चंदा अनिल अंभोरे (३५, ह. मु. जयभवानीनगर, मूळ रा. चंदनझिरा, जालना) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. शैलेश अजय बेंजामीन (२५, रा. सिडको एन-६) याच्यासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या चंदाने लग्नासाठी सारखा तगादा लावला होता. ‘ती’ नको असल्यानेच शैलेशने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह चिकलठाणा गायरानात पेट्रोल टाकून जाळल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी अखेर शैलेशला अटक केली. याविषयी अधिक माहिती देताना पोलीस उपायुक्तराहुल श्रीरामे यांनी सांगितले की, १६ जून रोजी सकाळी चिकलठाणा गायरानमध्ये एका अनोळखी महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. मृताची ओळखही पटलेली नव्हती आणि औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागातील हरवलेल्या महिलांचे वर्णनही या महिलेशी जुळत नव्हते. त्यामुळे या खुनाचे गूढ उकलणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मृताची ओळख पटावी, यासाठी पोलीस युद्धपातळीवर प्रयत्न करीत होते. शिवाय खबऱ्यालाही पोलिसांनी कामाला लावले होते. अखेर जयभवानीनगर येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणारी चंदा अंभोरे ही बेपत्ता असल्याचे खबऱ्याने पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी तिचा प्रियकर शैलेश बेंजामीन असल्याची माहिती समोर आली. मग पोलिसांनी शैलेशचा शोध सुरू केला. तो टॅक्सी कार चालवीत असे. शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शैलेशला पोलिसांनी उचलले. त्यानंतर त्यास पोलिसी खाक्या दाखवून चौकशी सुरू केली. आधी आपल्याला काहीच माहीत नाही म्हणणाऱ्या शैलेशने अखेर तोंड उघडले. चंदासोबत आपण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे सांगत त्याने तिच्या खुनाचीही कबुली दिली. परंतु चंदा काही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. ती त्याच्याकडे सतत पैशाचीही मागणी करीत होती. शैलेशच्या बहिणीचा २२ जून रोजी साखरपुडा होता. या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी पैसे लागणार असल्याने सध्या तुला पैसे देता येणार नाही, असे शैलेशने तिला सांगितले होते. १५ जून रोजी दुपारी शैलेश जयभवानीनगर येथे मृताच्या घरी गेला. त्यावेळी तिने पुन्हा लग्नाचा विषय काढला आणि पैशासाठी तगादा लावला. यावेळी त्यांच्यात जोरदार भांडण झाले आणि रागाच्या भरात शैलेशने तिचा गळा आवळून खून केला. तिला खाटेवर झोपवून तो तेथून निघून गेला. रात्री ९ ते ९.३० वाजेच्या सुमारास चंदाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने त्याने एका पेट्रोलपंपावरून अडीचशे रुपयांचे पेट्रोल कॅनमध्ये घेतले. त्यानंतर तो जयभवानीनगरला आला. गुपचूप अंधारात कारमध्ये चंदाचा मृतदेह टाकून त्याने चिकलठाणा गायरानातील आठवडी बाजाराजवळील नाला गाठला. तेथे कुणीही नव्हते. मग शैलेशने प्रेत कारमधून ओढत ओढत नाल्यात आणले आणि त्यावर पेट्रोल टाकून पेटवून देऊन धूम ठोकली, असे तपासात समोर आल्याचे उपायुक्त श्रीरामे यांनी सांगितले. हा गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी सिडको एमआयडीसी ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी, झोन पथकाचे फौजदार नेताजी गंधारे, कर्मचारी विक्रम वाघ, राम अत्तरगे, राठोड आणि राजू पवार यांनी केली. हा अवघड गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल या पथकाला पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी तातडीने ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. चौकटलग्नासाठी पोलीस ठाण्यात धावविशेष म्हणजे शैलेश लग्न करण्यास टाळाटाळ करीत असल्याने चंदाने थेट पोलिसांकडे धाव घेतली होती. काही दिवसांपूर्वी तिने पुंडलिकनगर चौकी आणि पोलीस उपायुक्त कार्यालयात तक्रार अर्ज दिला होता; परंतु खाजगी प्रकरण असल्याने पोलिसांनी त्यावेळी त्यात फारसा रस घेतला नाही.लग्न करण्याचा आग्रह बेतला जिवावर...शैलेशने चंदाला जयभवानीनगर येथे रूम भाड्याने घेऊन दिली होती. माझ्याशी लग्न कर आणि मला पत्नीचे स्थान दे यासाठी चंदा ही शैलेशकडे सतत आग्रह धरीत होती. शैलेशचे चार वर्षांपूर्वी पहिले लग्न झालेले आहे. मात्र पत्नीसोबत त्याचा वाद सुरू आहे. पहिल्या पत्नीकडून घटस्फोट घेतल्याशिवाय दुसरे लग्न शक्य नाही. तसेच लहान बहिणीचेही लग्न करायचे असल्याने सध्या आपण लिव्ह इनमध्येच राहू, असे तो सांगत होता.खुनानंतर चंदाच्या मुलीला आजीकडे नेऊन सोडले... आरोपी शैलेशने चंदाचा खून केला. त्यावेळी तिची पहिल्या पतीपासून झालेली आठ वर्षीय मुलगी तेथेच होती. मग आरोपी शैलेशने तिला उचलले आणि चंदाचे आई- वडील राहत असलेल्या चंदनझिरा या गावी घेऊन गेला. चंदाच्या आई- वडिलांच्या घरापासून काही अंतरावर त्याने मुलीला गाडीतून उतरविले आणि ‘ते तुझ्या आजीचे घर आहे. तेथे जा’ असे सांगून त्याने तिला सोडले व तो माघारी आला. नंतर त्याने तिच्या प्रेताची विल्हेवाट लावली, असे तपासात समोर आले आहे.