उस्मानाबाद : शहरासह जिल्हाभरात शनिवारी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त ठिकठिकाणी सामूहिक नमाजचे आयोजन करण्यात आले होते. नमाज अदा करून मुस्लिम बांधवांनी अल्लाहकडे पाऊस पडून दुष्काळ हटू दे, अशी प्रार्थना केली. समुहिक नमाजनंतर हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.येथील ईदगाह मैदानावर सकाळी आयोजित सामुहिक नमाजसाठी शहराच्या विविध भागातून हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते. तसेच माजी खा. डॉ. पद्मसिंह पाटील, आ. राणाजगजितसिंह पाटील, माजी आ. ओम राजेनिंबाळकर, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वासराव शिंदे आदी राजकीय पदाधिकाऱ्यांसह प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे आदी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी येथे उपस्थित होते. यानंतर हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. ईदनिमित्त दिवसभर हिंदू-मुस्लिम बांधव एकमेकांना शुभेच्छा देताना दिसून आले. उमरगा : येथे गुंजोटी रोडवरील ईदगाह मैदानावर सकाळी सामुहिक नमाज अदा करण्यात आली. अबाल-वृध्दही यावेळी नवीन कपडे परिधान करून मोठ्या उत्साहात एकमेकांना अलिंगन देवून ईदच्या शुभेच्छा देत होते. शहरात ठिकठिकाणी ईदनिमित्त शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले होते. ईदगाह मैदानाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, शिवसेनेच्या वतीने आ. ज्ञानराज चौगुले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना पुष्प देवून ईदच्या शुभेच्छा दिल्या. भूम : येथील वाशी रोडवरील ईदगाह मैदानात शेकडो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली. यानिमित्त शहरात दिवसभर ईद सणाच्या शुभेच्छा देण्या येत होत्या. ग्रामीण भागातही हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नळदुर्ग : येथे ईदगाह व जामा मशिद येथे सामुहिक नमाज अदा करण्यात आली. यावेळी पाऊस पडावा यासाठी विशेष प्रार्थनाही करण्यात आली. नगर परिषदेतील विरोधीपक्ष गटनेते नय्यर जहागीरदार यांंनी ईदनिमित्त हिंदू-मुस्लिम बांधवांसाठी भोजनासह शिरखुरमा, गुलगुले वाटप केले. शिराढोण : कळंब तालुक्यातील शिराढोण येथे मुस्लीम बांधवांच्या वतीने ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज अदा करण्यात आली. याप्रसंगी सरपंच मनिषा शहाणे, जि.प. सदस्या कांचनमाला संगवे, ग्रामविकास अधिकारी अशोक आमले, राजेंद्र कापसे, बालासाहेब यादव, जगदीशचंद्र जोशी, दत्ता महाजन, प्रतापराव पाटील, किरण नान्नजकर, श्रीहरी माळी आदींनी मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या. तसेच शिवसेनेच्या वतीने ग्रा.पं. सदस्य राजेश्वर पाटील, राजेंद्र गुरव, राजेंद्र मुंदडा, अमोल पाटील, आर्यमित्र नाईकवाडे, रणजित गवळी, अॅड. नितीन पाटील, ज्योतिराम माळी तर काँग्रेसतर्फे ग्रा.पं. सदस्य अमोल माकोडे, अशोक महाजन, नितीन पाटील, दत्ता धाकतोडे आदींनी शुभेच्छा दिल्या.लेहारा : येथील ईदगाह मैदनावर मुस्लिम बांधवानी शनिवारी सकाळी सामुहिक नमाज आदा केली. त्यानंतर हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तुळजापूर : येथील घाटशीळ रोडवरील ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज अदा करण्यात आली. प्रारंभी मौलवी गुलामसाहब यांनी धार्मिक पठण केले. यानंतर नमाज अदा करण्यात आली. शुभेच्छा देण्यासाठी नगरसेक गणेश कदम, दिलीप गंगणे, गोकुळ शिंदे, नारायण गवळी, तहसीलदार काशीनाथ पाटील, पोनि ज्ञानोबा मुंडे, बंटी गंगणे, आनंद कंदले आदी यावेळी उपस्थित होते. कळंब : येथील ईदगाह मैदानावर सकाळी नमाज अदा करून सर्वांना सुख, शांती मिळावी व पाऊस पडून दुष्काळाचे सावट दूर व्हावे, यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी पोनि सुनील नेवसे, माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे, भागवत चोंदे, राजेंद्र मुंदडा, कमलाकर कोकीळ, सुनील गायकवाड आदींनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. मुस्लिम बांधवांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. ईटकूर येथेही मज्जिदमध्ये नमाज अदा करुन ईद उत्साहात साजरी करण्यात आली. ४परंडा : येथे करमाळा राज्य मार्गावरील ईदगाह मैदानात शहरे काजी जफर काजी यांच्या नेतृत्वाखाली नमाज पठण करण्यात आली. यात हजारो मुस्लिम बांधवांनी सहभाग नोंदविला. महसूल विभागाच्या वतीने नायब तहसीलदार एस. एस. पाडळे, पोलिस प्रशासनातर्फे पोनि डी. हस. डी. एस. डंबाळे यांनी शहर काजी जफर काजी आदी मुस्लिम बांधवांना पुष्प देवून शुभेच्छा दिल्या.
रमजान ईद उत्साहात
By admin | Updated: July 19, 2015 00:58 IST