लातूर : औसा तालुक्यातील शिंदाळा येथील राधिका कला केंद्रावर नृत्य पाहण्यासाठी गेलेल्या चौघा जणांना कला केंद्राच्या मालकाकडून मारहाण झाल्याची घटना घडली. याबाबत भादा पोलिसात गुरुवारी गुन्हा नोंद करण्यात आला. लातूर तालुक्यातील अमोल बिभीषण गुळभिले व अन्य तिघेजण शिंदाळा येथील राधिका कला केंद्रावर नृत्य पाहण्यासाठी गेले होते. अर्धा तास नृत्य व गाण्यांचा कार्यक्रम पाहिल्यानंतर घरी जाण्यासाठी ते स्वत:च्या गाडीत जाऊन बसले असता कला केंद्रातील सहा ते सात जणांनी मारहाण केली, असे गुळभिले यांनी भादा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार कला केंद्राचे मालक व अन्य दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
राधिका कला केंद्रावर मारहाण
By admin | Updated: July 24, 2015 00:45 IST