परभणी : नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील कुटुंबियांना खाजगी नळ व वैयक्तिक शौचालय मंजूर झाले आहे़ या यादीचे प्रकाशन स्थायी समितीचे सभापती विजय जामकर यांच्या हस्ते झाले़ येथील बी़ रघुनाथ सभागृहात ही यादी लावण्यात आली आहे़ प्रकाशनप्रसंगी सभापती विजय जामकर म्हणाले, शहराच्या विकासासाठी, गरीब जनतेसाठी महापौर प्रताप देशमुख यांनी दलित वस्तीमध्ये शासनाकडून २ हजार ८५० नळ जोडणी आणि २ हजार ७२३ वैयक्तीक शौचालय मंजूर करून आणले आहेत़ यासाठी आर्किटेक संजय कापसे यांनी परिश्रम घेतल्याचे जामकर यांनी सांगितले़ प्रस्तावित खाजगी नळजोडणी व वैयक्तिक शौचालयासाठी परिगणतीनुसार येणारी किंमत व प्रभाग क्रमांक ३ ते २५ करीता एच़डी़ पी़एफ पाईप वितरण नलिका टाकणे या कामांसह निव्वळ रक्कम ६ कोटी ६१ लाख ८१ हजार ४९० रुपये आणि त्यावरील २ टक्के सल्लागार शुल्क, १ टक्का त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासणी शुल्क व तांत्रिक मंजुरी शुल्क यासह ढोबळ रक्कम ६ कोटी ९७ लाख ९४ हजार ३२५ रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे़ यानुसार शहरात महाराष्ट्र सुवर्ण महोत्सव नागरी दलित वस्ती, पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेंंतर्गत अनुसूचित जाती व बौद्ध घटकांमधील कुटुंबियांना खाजगी नळ जोडण्या व वैयक्तिक शौचालय उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)
शौचालय लाभार्थ्यांच्या यादीचे प्रकाशन
By admin | Updated: September 13, 2014 23:07 IST