शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

१३७ गुणवंतांना पारितोषिकांचे वाटप

By admin | Updated: June 27, 2014 01:04 IST

औरंगाबाद : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्ता विकास योजनेंतर्गत मनपाच्या ७७ शाळांमधील विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेल्या १३७ विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.

औरंगाबाद : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्ता विकास योजनेंतर्गत मनपाच्या ७७ शाळांमधील विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेल्या १३७ विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. महापौर म्हणाल्या, मनपा शाळेत गरिबांची मुले शिकतात. यावर्षी चांगला निकाल लागला आहे. येथून ही परंपरा कायम राहिली पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून पारितोषिके देण्यात आली आहेत. पालकांनी त्या रकमेचा योग्य वापर करावा. ती रक्कम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरच खर्च होईल, याची काळजी घ्यावी. उपमहापौर संजय जोशी म्हणाले, श्रीमंतांच्या मुलांना सर्व सुविधा मिळतात. मनपा शाळेतील मुलांनी त्या तुलनेत मोठे काम केले आहे. सभागृह नेते किशोर नागरे, सभापती विजय वाघचौरे यांची यावेळी भाषणे झाली. प्रास्ताविक करताना आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे म्हणाले, मनपाने मागासवर्गीयांसह सर्व विद्यार्थ्यांना गणवेश दिले. शिक्षणासाठी जास्तीचा निधी उपलब्ध करून दिला. यावर्षीपेक्षा पुढच्या वर्षी शाळेची गुणवत्ता वाढेल. मिलिंद दाभाडे आणि शे.फरिना राज महंमद यांनी आयुक्त, शिक्षक, सराव वर्ग, परीक्षा, प्रश्नसंच अपेक्षित, संगणक कक्ष, व्हॅकेशनमुळे यश मिळाल्याचे मनोगतामध्ये सांगितले. मुकुंदवाडी, शहाबाजार, प्रियदर्शिनी इंदिरानगर, मिटमिटा या शाळांना महापौरचषक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड, गटनेते गजानन बारवाल, सभापती कमल नरोटे, सविता सुरे, नगरसेविका रेखा जैस्वाल, प्राजक्ता भाले, उपायुक्त पेडगावकर, रवींद्र निकम, शिक्षणाधिकारी ए. एम. शेख व विद्यार्थ्यांसह पालकांची उपस्थिती होती. १७ लाखांची पारितोषिकेदाभाडेला ७५ हजार रुपयांचे पारितोषिक, तर उर्वरित ८० ते ८४ टक्क्यांपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ५० हजार, ७५ ते ८० टक्के मिळविणाऱ्यांना ३५ हजार, ७० ते ७५ टक्के मिळविणाऱ्यांना २० हजार आणि ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना ३ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. १७ लाख रुपयांची ती रक्कम होती.