लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघाच्या परभणी शाखेच्या वतीने १६ आॅगस्टपासून विविध मागण्यांसाठी संप सुरू केला आहे. परभणी येथील मुख्य पोस्ट कार्यालयासमोर घोषणाबाजी करून संपात सहभागी होण्याचे आवाहन केले.जीडीएस कमिटीच्या रिपोर्टला एआयजीडीएसयुद्वारा दिलेल्या सूचनांसह लागू कराव्यात, ग्रामीण डाक सेवकांना आठ तास काम काम द्यावे, पेन्शन लागू करावी आदी मागण्यांसाठी अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघाच्या वतीने १६ आॅगस्टपासून संप सुरू केला आहे. बुधवारी परभणी येथील डाक कार्यालयासमोर कर्मचाºयांनी घोषणाबाजी करून संपात सहभागी होण्याचे आवाहन केले.यावेळी संघटनेचे अध्यक्ष यु.बी. रूपनर, उपाध्यक्ष एस.के. तिडके, सचिव मारोतराव फुलझळके, खजिनदार निवृत्ती शेळके, बळीराम कच्छवे, किशन वाघ, गणेश लांडगे, सुधाकर घुगे, सुशील जोशी, ताजोद्दीन, खिल्लारे आदी उपस्थित होते़ या संपामुळे ग्रामीण भागातील टपाल व्यवस्था कोलमडून पडली आहे.
डाकसेवकांचा संप सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:44 IST