शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
3
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
4
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
5
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
6
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
7
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
10
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
11
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
12
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
13
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
14
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
15
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
16
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
17
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
18
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
19
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट

पोलीस-दरोडेखोरांत चकमक

By admin | Updated: December 11, 2014 00:47 IST

औरंगाबाद : पहाटेच्या वेळी उस्मानपुरा परिसरातील एका बंगल्यावर दरोडा टाकत असलेल्या आरोपींना पकडण्यासाठी पोलीस गेले, तेव्हा पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चांगलीच चकमक उडाली.

औरंगाबाद : पहाटेच्या वेळी उस्मानपुरा परिसरातील एका बंगल्यावर दरोडा टाकत असलेल्या आरोपींना पकडण्यासाठी पोलीस गेले, तेव्हा पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चांगलीच चकमक उडाली. यावेळी दरोडेखोरांनी दगडफेक आणि टॉमीने केलेल्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचाऱ्यांबरोबरच बंगल्याचा सुरक्षारक्षकही जखमी झाला. पहाटे सव्वाचार ते साडेचार या कालावधीत घडलेल्या या थराराअंती दोन दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले.गुरुमुखसिंग कल्याणी ऊर्फ टॉम (रा. छोटा मुरलीधरनगर) व पप्पूसिंग कल्याणी (रा. छोटा मुरलीधरनगर) अशी अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. दोघे रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहेत. आरोपींच्या ताब्यातून दरोड्यात लुटलेले रोख साडेआठ हजार रुपये, तसेच टॉमी, सुरा, स्क्रू ड्रायव्हर जप्त करण्यात आले. त्यांचे साथीदार मात्र पोलिसांना चकमा देण्यात यशस्वी झाले.वॉचमनवर हल्ला करीत बंगल्यात घुसलेघटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे चार वाजेच्या सुमारास कुख्यात गुन्हेगार टॉम, पप्पूसिंग व त्यांच्या सशस्त्र साथीदारांनी उस्मानपुऱ्यातील अ‍ॅडमिरल हॉटेलसमोर असलेल्या सुरेश शांतीलाल शहा यांच्या बंगल्यात प्रवेश केला. शहा हे कुटुंबासह विदेशात राहतात. त्यांच्या या बंगल्यावर शेख अंजूम शेख बाबा (रा. शंभूनगर) हे वॉचमन म्हणून नोकरी करतात. आत घुसताच दरोडेखोरांनी शेख अंजूम यांच्या डोक्यात लोखंडी टॉमीने जोरदार प्रहार केला. त्यामुळे ते खाली कोसळले.मग दरोडेखोरांनी दरवाजा तोडून बंगल्यात प्रवेश केला. बंगल्यात दरोडेखोर घुसल्याचे जवळच राहणाऱ्या एका जणाच्या नजरेस पडले. त्याने तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. पोलिसांनी घेरताच सुरू केली दगडफेकनियंत्रण कक्षाकडून बंगल्यात चोर घुसल्याची माहिती मिळताच उस्मानपुरा ठाण्याचे बीट मार्शल सहायक फौजदार काकासाहेब कुबेर, लोभाजी सुकरे, तसेच वन मोबाईलचे सहायक फौजदार बद्रीनाथ घोंगडे, के. बी. भादवे, गोपाल पुरभे हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तो बंगला घेरला. पोलिसांची चाहूल लागताच चोरट्यांनी बंगल्यात मिळालेला ऐवज उचलून धूम ठोकली; परंतु आता आपण पकडले जाऊ, असे लक्षात येताच त्यांनी पोलिसांच्या दिशेने जोरदार दगडफेक सुरू केली. या दगडफेकीत पोलीस कर्मचारी कुबेर आणि सुकरे यांना गंभीर मार लागला. सुकरे तर बेशुद्ध पडले. त्याचवेळी सहायक फौजदार घोंगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दरोडेखोरांचा पाठलाग सुरू केला. बंगल्याच्या मागील बाजूने ते पळाले. अचानक या दरोडेखोरांच्या टोळीचा म्होरक्या टॉमने अंधारातून धोंगडे यांच्या डोक्यावर टॉमीने प्रहार केला. मार लागल्यानंतरही धोंगडे यांनी टॉमला पकडले.तितक्यात इतर पोलीस कर्मचारी तेथे पोहोचले आणि त्यांनी टॉमला ताब्यात घेतले. त्याचवेळी टॉमची सुटका करण्यासाठी पप्पूसिंग पोलिसांवर चाल करून आला. त्याने केलेला वार चुकवीत पोलिसांनी त्यालाही मोठ्या शिताफीने पकडले. चकमकीची हीच संधी साधून या टोळीतील इतर दरोडेखोर पसार होण्यात यशस्वी झाले. तोपर्यंत घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला होता. जखमी पोलीस व वॉचमनला तात्काळ घाटीत दाखल करण्यात आले. फरार झालेल्या साथीदारांच्या शोधार्थ संपूर्ण परिसर पिंजून काढला; परंतु ते सापडले नाहीत. या प्रकरणी आरोपींविरुद्ध उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.बेशुद्धीचे नाटक केल्याने वॉचमन वाचलादरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात शहा यांच्या बंगल्याचा वॉचमन शेख अंजूम हा गंभीर जखमी झाला. फटका बसताच तो खाली कोसळला. आता जर आपण उठलो, तर दरोडेखोर आपला जीव घेतील, या भीतीपोटी वॉचमनने बेशुद्ध पडल्याचे नाटक केले. त्यामुळे तो बचावला. आयुक्तांकडून दहा हजारांचे बक्षीसआपल्या जिवाची पर्वा न करता या सशस्त्र दरोडेखोरांचा सामना करणाऱ्या उस्मानपुरा पोलीस व गुन्हे शाखा पोलिसांचे पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी कौतुक केले. तसेच या पोलीस पथकाला दहा हजार रुपयांचे रोख बक्षीसही देण्यात आले.