शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
4
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
5
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
6
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
7
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
8
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
9
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
10
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
11
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
12
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
13
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
14
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
15
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
16
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
17
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
18
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
19
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
20
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?

पोलीस भरतीत उमेदवाराला बनवेगिरी नडली

By admin | Updated: June 23, 2014 00:31 IST

औरंगाबाद : पोलीस आयुक्तालयात सुरू असलेल्या भरतीमध्ये शारीरिक क्षमता चाचणीसाठी स्वत: सामोरे न जाता आपल्या नावावर मित्राला मैदानात उतरविणाऱ्या उमेदवाराची बनवेगिरी उघडकीस आली.

औरंगाबाद : पोलीस आयुक्तालयात सुरू असलेल्या भरतीमध्ये शारीरिक क्षमता चाचणीसाठी स्वत: सामोरे न जाता आपल्या नावावर मित्राला मैदानात उतरविणाऱ्या उमेदवाराची बनवेगिरी उघडकीस आली. बेगमपुरा पोलिसांनी बनवेगिरी करणाऱ्या उमेदवारास अटक केली आहे. यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, आयुक्तालयातील मैदानावर सुरू असलेल्या पोलीस भरतीमध्ये शनिवारी विजय बालचंद घुसिंगे (२४, रा. किनगाववाडी, पो. रोहिलागड, ता. अंबड) या उमेदवाराची शारीरिक क्षमता चाचणी होती. आज पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास विद्यापीठ परिसरात ५ किलोमीटर धावण्याची चाचणी होती. मात्र, ऐनवेळी विजय मुराडे याने त्यात उतरण्यास नकार दिला. मुलाला शाळेत प्रवेश घ्यायचा म्हणून तो गावी निघून गेला. त्यामुळे विजय घुसिंगे याची मोठी पंचाईत झाली. तो आज सकाळी विद्यापीठ परिसरात गेला. पोलिसांनी त्याचे प्रवेशपत्र तपासले. मात्र, लॅपटॉपवर त्याच्या क्रमांकावर दुसऱ्याच व्यक्तीचा फोटो असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.पोलिसांनी ही बाब आपल्या वरिष्ठांना कळविली. वरिष्ठांनी विजय घुसिंगे यास विश्वासात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्याने शनिवारी माझ्याऐवजी मित्र विजय मुराडे याने शारीरिक क्षमता चाचणी दिल्याचे कबूल केले. त्यानुसार उपनिरीक्षक धर्मराज देशमुख यांनी बेगमपुरा ठाण्यात विजय घुसिंगेच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. बेगमपुरा ठाण्याचे उपनिरीक्षक सुभाष हिवराळे यांनी आरोपी उमेदवारास अटक केली असून, ते पुढील तपास करीत आहेत. स्वत: मैदानात न उतरता मित्राला उतरविलेविजय घुसिंगे याने स्वत: शारीरिक क्षमता चाचणीला सामोरे न जाता त्यासाठी आपला मित्र विजय प्रल्हाद मुराडे (२२) यास मैदानात उतरविले. त्यासाठी घुसिंगे याने प्रवेशपत्रावर मुराडेचा फोटो लावला. मुराडे हा काल शनिवारी सकाळी मैदानात उतरला. त्याने १०० मीटर धावणे, गोळाफेक व पूलअप्स या सर्व चाचण्या बिनबोभाट दिल्या. त्यात तो ५ किलोमीटर धावण्यासाठी निवडला गेला.