बीड : शिरुर येथे कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेदरम्यान झालेल्या गदारोळानंतर आता आरोग्य विभागाने चांगलाच ‘धडा’ घेतला आहे. आता कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया नियोजनबद्धपणेच होणार आहेत. त्याचा कृतीआराखडा देखील तयार केला आहे. २५ एप्रिल २०१४ रोजी शिरुर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीर आयोजित केले होते. या शिबिरात शंभर महिलांची नोंदणी झाली होती. ६८ महिलांच्या शस्त्रक्रिया आटोपून सर्जन डॉ. नागेश चव्हाण यांनी काढता पाय घेतला होता. त्यामुळे ३८ महिलांना शस्त्रक्रि येसाठी ताटकळत थांबावे लागले़ शिवाय शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना जागेअभावी वºहांड्यातच रात्र काढावी लागली होती़ ‘लोकमत’ने हा विषय विस्ताराने मांडला होता़ त्यानंतर उपसंचालक डॉ़ एम़ एस़ डिग्गीकर यांनी स्वत: शिरुरला भेट देऊन माहिती घेतली होती़ शिवाय जिल्हा आरोग्य अधिकार्यांकडे खुलासाही मागविला होता़ उपसंचालक डॉ़ डिग्गीकर यांनी दिलेल्या सूचनेनंतर जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांनी एकत्रित येऊन जून महिन्यातील कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया शिबिरांचे नियोजन केले आहे़ जूनमध्ये एकूण ३४ शिबिरे होणार आहेत़ त्यापैकी २९ शिबिरे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये होतील़ एक शिबीर जिल्हा रुग्णालय, दोन शिबिरे गेवराई व परळी येथील उपजिल्हा रुग्णालयांत तर दोन शिबिरे माजलगाव व पाटोदा ग्रामीण रुग्णालयांमध्ये होतील़ एका शिबिरात फक्त २५ महिलांचा समावेश करण्यात येईल़ कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांसाठी यापूर्वी डॉ़ नागेश चव्हाण हे एकमेव सर्जन होते़ आता कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिराच्या पॅनलवर आणखी दोन खाजगी सर्जनना घेतले आहे़ डॉ़ त्र्यंबक चाटे व डॉ़ सुभाष यंदे या दोघांचा त्यात समावेश आहे़ विशेष म्हणजे यापुढे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ अशोक बोल्डे हे स्वत: शस्त्रक्रिया करणार आहेत़ ‘डीएचओ’, ‘सीएस’ यांचे नियंत्रण यापुढे कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यापूर्वी जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांची परवानगी आवश्यक राहणार आहे़ त्यांनी निश्चित केलेल्या तारखेलाच शिबीर होईल़ एका दिवशी एकच किंंवा जास्तीत जास्त दोन शिबिरे घेता येतील़ (प्रतिनिधी) ‘टीएचओं’वर जबाबदारी निश्चित उपसंचालक डॉ़ एम़ एस़ डिग्गीकर यांनी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिरांची जबाबदारी यापुढे तालुका आरोग्य अधिकार्यांवर निश्चित केली आहे़ त्यामुळे तालुका आरोग्य अधिकार्यांची जबाबदारी वाढली आहे़ सर्जनला पाचारण करण्यापासून ते शिबिरात रुग्णांना सर्वसुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम तालुका आरोग्य अधिकार्यांना करावे लागेल़
कुटुंब नियोजन आता नियोजनबद्ध
By admin | Updated: May 30, 2014 00:23 IST