शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

पिंगळगड प्रकल्पामुळे सिंचनाचा प्रश्न सुटणार

By admin | Updated: May 3, 2016 01:07 IST

परभणी : पिंगळगड नाला नदी पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे या भागातील ३८ कि. मी. परिसरातील गावांच्या सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.

परभणी : पिंगळगड नाला नदी पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे या भागातील ३८ कि. मी. परिसरातील गावांच्या सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन होत असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून धन्यता वाटत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दिवाकर रावते यांनी केले.महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी पिंगळी येथे पिंगळगड नाला नदी पुनरुज्जीवन भूमिपूजन सोहळा पार पडला. उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री रावते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजेश विटेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. डॉ. राहुल पाटील, आ. मोहन फड, जिल्हाधिकारी राहुल महिवाल, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, तालुकाप्रमुख नंदकुमार आवचार, जालना येथील लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता टी. एस. कोंडेकर, जि. प. सदस्य संताबाई लोखंडे, सरपंच उज्ज्वला खाकरे, युवा सेनेचे तालुकाप्रमुख संदीप झाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कपाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात प्रकल्पाच्या मान्यतेसाठी परिश्रम घेतल्याबद्दल आ. डॉ. राहुल पाटील यांचा पिंगळी व रायपूर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. आ. डॉ. राहुल पाटील म्हणाले, पावसाचा प्रत्येक थेंब आडवून जमिनीत जिरविण्यासाठी बंधाऱ्यांची दुरुस्ती, नाला खोलीकरण, रुंदीकरणाची कामे झपाट्याने सुरु आहेत. पिंगळगड नाल्याचे नदी सारख्या विस्तृत पात्रात रुपांतर करण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता शिंदे, फरदील खान , विनय सुदेवाड, कोंडेकर यांची वेळोवेळी मदत झाली. या प्रकल्पांतर्गत येणाऱ्या १६ गावांमधील ग्रामस्थांनी मला प्रेरित केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेनुसार या प्रकल्पाच्या दुतर्फा १० हजार झाडे लावून हा परिसर ग्रीन हब म्हणून विकसित केला जाणार आहे. पुढील वर्षी अशाच प्रकारे धामोडी नाला नदी पुनरुज्जीवन प्रकल्प पूर्णत्वास नेणार असल्याचे आ.पाटील यांनी सांगितले. प्रारंभी कनिष्ठ अभियंता शिवाजी शिंदे यांनी प्रकल्पाची तांत्रिक माहिती विषद केली. सूत्रसंचालन अभय कुलकर्णी यांनी केले. यशस्वीतेसाठी भाऊसाहेब गरुड, उमेश खाकरे, संजय गरुड, विजयराव गरुड, लखन गरुड, धोंडी खाकरे, रावसाहेब गरुड, संभाजी गरुड, डिगंबर गरुड, रामकिशन गरुड, संभाजी लोखंडे, राहुल लोखंडे, प्रकाश लोखंडे, मधुकर दामोधर, किशन दामोधर, भानुदास डुब्बे, नितीन गरुड, सिद्धांत वसमतकर, रणजीत मकरंद, अच्युत चापके, अंकुश मस्के आदींनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते जिल्हा ग्रंथालयाच्या नूतन इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण व तारांगण इमारत बांधकामाचे भूमिपूजन १ मे रोजी वसमत रोडवरील नियोजित जागा परिसरात करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल महिवाल, आ.डॉ.राहुल पाटील, आ.मोहन फड, जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर, महापौर संगीता वडकर, उपमहापौर भगवान वाघमारे, सभापती गणेश देशमुख, मनपा विरोधीपक्ष नेत्या अंबिका डहाळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते तारांगण इमारत बांधकामाचे भूमिपूजन, जिल्हा ग्रंथालयाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी आ.डॉ.पाटील, जिल्हाधिकारी महिवाल, महापौर वडकर यांनी मनोगत व्यक्त केले. रावते म्हणाले, शहराच्या विकासासाठी सदैव तत्पर असून विकासासाठी कधीही निधी कमी पडू दिला जाणार नाही. शहरातील सर्व रस्त्यांवरील अतिक्रमणे काढून होर्डिग्ज काढून टाकावीत. शहराचा श्वास मोकळा झाला पाहिजे, असे पालकमंत्री रावते म्हणाले. अभय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी नवनीत पाचपोर, गोविंद पारडकर, राजेंद्र वडकर, अनिल डहाळे, राजू कापसे, संजय गाडगे, दीपक देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा ग्रंथालय अधिकारी रिद्दीवाडे, उपअभियंता ढोबळे यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी मनपाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.