शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

पगार द्या; नाही तर कर्मचारी संपावर जाणार

By admin | Updated: December 16, 2014 01:05 IST

लातूर : शहर महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून वेतन थकले आहे़

लातूर : शहर महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून वेतन थकले आहे़ तिसरा महिना संपत आला तरी अद्याप पगार मिळाला नाही़ काम पाहिजे असेल तर अगोदर पगार द्या, नाही तर संपावर जावू असा ईशारा सोमवारी सफाई कर्मचाऱ्यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे़ १ कोटी ६० लाख रूपये कर्मचाऱ्यांचे वेतन थकित आहे़लातूर शहर महापालिकेत जवळपास ६६० सफाई कर्मचारी आहेत़ त्यापैकी केवळ ३६० कर्मचारी सफाईचे काम करीत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे़ इतर कर्मचारी विविध विभागात कार्यरत असल्याचे सांगितले जात असले तरी शेकडो कर्मचारी नेमकी कुठे सेवा बजावतात, याचा थांगपत्ता प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही अद्याप लागला नाही़ नियुक्ती सफाई कर्मचाऱ्यांची असली तरी अनेक कर्मचारी मनपात ‘साहेबांच्या’ तोऱ्यात वावरतात़ गेल्या महिनाभरापासून मनपा प्रशासनाने सफाईच्या कामाला गती दिली आहे़ काम वाढल्याने काही कर्मचारी नेत्यांनी दोन महिन्यांचे वेतन रखडल्याची बाब पुढे करून आंदोलनाची भूमिका घेतली आहे़ वेतन नसल्याने दोन महिन्यांपासून उपासमारीची वेळ आली आहे, किराणा दुकानात सामान उधार मिळत नाही, मुलांच्या शिक्षणासाठी पैसा नसल्याने घरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत़ कोणी उधार पैसा द्यायला तयार नाही, अशी माहिती पोटतिडकीने सफाई कर्मचाऱ्यांनी महापौर अख्तर शेख, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांना दिली़ जवळपास दीड तास कर्मचारी महापौर दालनात चर्चा करीत बसले होते़ यावेळी संघटनेचे अध्यक्ष रामदास शिंदे, सरचिटणीस कॉ़ राम वडवळे, रिपाइंचे गटनेते चंद्रकांत चिकटे यांच्यासह सफाई कर्मचारी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)४राज्य शासनाकडून लातूर शहर महापालिकेला सहाय्यक अनुदान मंजूर झाले आहे़ दुसरा हप्ता अद्याप मिळालेला नाही़ दुसरा हप्ता मिळाल्यावर सर्वांचे वेतन दिले जातील, अशी माहिती मनपा आयुक्त तेलंग यांनी दिली़ ४मनपाकडे असलेल्या निधीतून वेतन द्या, अशी मागणी करीत सफाई कर्मचारी आक्रमक झाले़ तीन महिन्यांचे वेतन न दिल्यास संपावर जाण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे़ दोन दिवसांत बैठक घेऊन कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा केली जाईल़ त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सांगितले़ ४महापौर अख्तर शेख म्हणाले, सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन थकविले जाणार नाही. निधी प्राप्त होताच वेतन दिले जाईल. शिवाय, मनपाकडून काही आर्थिक तरतूद करता येईल का, याची पाहणी करू.सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा १० तारखेपर्यंत मिळावे, कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर एकत्र बैठक घेऊन मार्ग काढावा़ याबाबत अनेकदा पत्रव्यवहार करूनही अद्याप कसलीही कारवाई झाली नाही, वेतनही थकले आहे़ वेतन लवकर न मिळाल्यास काम बंद करण्याचा इशारा मराठवाडा सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला आहे़